spot_img
अहमदनगरआमदार जगताप यांचा उद्योजकांना मोठा दिलासा; उचलले 'हे' पाऊल..

आमदार जगताप यांचा उद्योजकांना मोठा दिलासा; उचलले ‘हे’ पाऊल..

spot_img

उद्योजकांची आ. जगताप यांच्याशी चर्चा | अतिक्रमण हटविण्याची मागणी
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
गुंंडगिरी व अवैध धंद्यांमुळे कामगारांमध्ये दशहतीचे वातावरण आहे. गुन्हेगारीचे केंद्र बनत चाललेल्या अवैध धंदे चालविणार्‍या टपर्‍यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी यावेळी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे लावून धरली.

आमीच्या पुढाकारातून शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. एमआयडीसीमध्ये अवैध धंदे चालविणारे अनाधिकृत टपर्‍या वाढल्या असताना गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या टपर्‍यांमध्ये दारू, चरस, गांजा, अफू असे अमली पदार्थ विकले जातात. त्याचे सेवन करून गुन्हेगारीचे प्रमाण या परिसरात वाढत आहे. या सर्वांमुळे एमआयडीसी मधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील गंभीर झाला असल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले.

एमआयडीसीत कंपन्यातून चोर्‍यांच्या घटना सर्रासपणे घडत आहे. विशेषतः बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये वारंवार चोर्‍या होत असून, नुकतेच कामावरून परतणार्‍या तीन कामगारांना रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसीमध्ये कामासाठी येणार्‍या परप्रांतीय लोक रात्री दारू पिऊन त्रास देत आहेत. त्याचा बंदोबस्त करा तसेच एमआयडीसीसाठी तीन गावांच्या ग्रामपंचायती आहेत.

त्यांचा मालमत्ता कर वेगवेगळ्या तीन गाव मिळून करत असताना एकच मालमत्ता कर लागू करावा. एमआयडीसीसाठी एमएसईबीचे सबस्टेशन मंजूर आहे. परंतु जागे अभावी सबस्टेशन होत नाही. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. सनफार्मा चौक ते निबळक बायपास रस्त्याची खूप दुरावस्था झाली असून, तो रस्ता दुरुस्त करावा. अपघात टाळण्यासाठी सनफार्मा चौकामधील सिग्नल चालू करण्याची मागणी आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी केली.

आमी संघटनेच्या सर्व प्रश्न जाणून घेतल्यानंतर आमदार जगताप यांनी तात्काळ एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना फोन लावून सर्व घटनेची विचारपूस केली. तर सर्व अवैध धंदे तात्काळ बंद होण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच एमएसईबी अधिकार्‍यांशी फोनवर संपर्क साधून एमएसईबीचे सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे सांगितले. तर एमआयडीसीमध्ये कोणतीही घटना घडल्यास व काही अडीअडचणी निर्माण झाल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे सांगून उद्योजकांना त्यांनी धीर दिला.

या बैठकीसाठी उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, संजय बंदिष्टी, महेश इंदानी, राजेंद्र कटारिया, अरुण कुलकर्णी, प्रवीण बजाज, मिलिंद गंधे, मिलिंद कुलकर्णी, राजीव गुजर, प्रशांत विश्वासे, राजेंद्र शुक्रे, कल्पेश इंदानी, पुरुषोत्तम सोमानी, जुईली मुळे, विजय इंगळे, चिन्मय सूखथनकर, प्रफुल्ल नातू, निनाद टीपूगडे, नितेश लोढा आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...