spot_img
अहमदनगरआमदार जगताप यांनी दिला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा; कारण आलं समोर...

आमदार जगताप यांनी दिला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा; कारण आलं समोर…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून कारभार करत असताना अचानक पद्धतीने पाणीपट्टी वाढ केली असून ती अन्यायकारक आहे, जरी ते प्रशासक असले तरी नागरिकांच्या भावना लक्षात घेणे गरजेचे होते पण त्याचा कुठेही विचार केलेला दिसत नाही तरी वाढविलेल्या पाणीपट्टीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे.

महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी जल अभियंता परिमल निकम, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, सुरेश बनसोडे, बाळासाहेब जगताप, सचिन जगताप, कौशल गायकवाड, सागर गोरे, आकाश दंडवते, ओंकार घोलप आदी उपस्थित होते.

अहिल्यानगर शहरातील नळ धारकांच्या पाणीपट्टी दरात स्थायी समितीच्या माध्यमातून १००टक्के इतकी भरमसाठ वाढ केल्याचे समजते. आम्ही या दरवाढीचा तीव्र विरोध करतो, कारण ही वाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय जाचक आहे. दरवाढ करताना नागरिकांवर पडणाऱ्या आर्थिक बोजाचा पुरेसा विचार झाल्याचे दिसत नाही. पाणी पुरवठा योजना खर्चिक आहे, हे मान्य असले तरी, नागरिकांवर अतिरक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे.

या पार्शवभूमीवर आपण याचा पुनर्विचार करून पाणीपट्टी दरवाढ मर्यादित ठेवावी, अशी आमची मागणी आहे. तसेच, शहरातील ज्या भागांमध्ये ३-४ दिवसांनी पाणी पुरवठा होतो किंवा अत्यल्प पाणी मिळते, त्या भागांतील नागरिकांसाठी मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा.

याशिवाय, मीटरद्वारे दिल्या जाणाऱ्या पाण्याचे दर वाजवी ठेवावेत, जेणेकरून नागरिकांना अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. तरी या संदर्भात त्वरीत कार्यवाही करून शहरातील नागरिकांच्या पाणी पट्टी दरात केलेली भरसमाट वाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...