spot_img
राजकारणआमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण ! भाजप पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक? हालचालींना वेग

आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण ! भाजप पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक? हालचालींना वेग

spot_img

कल्याण / नगर सह्याद्री : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली होती. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. गणपत गायकवाड हे सध्या अटकेत असून 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी त्यांना सुनावली गेली आहे. या घटनेमुळे कल्याण डोंबिवली शहरात भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भाजप कार्यकर्ते गणपत गायकवाड यांच्या बाजूने उभे असल्याची माहिती मिळत आहे.

गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराच्या घटनेनंतर भाजप शहराच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचील गुप्त बैठक झाल्याची माहिती एका मीडियाने प्रसिद्ध केली असून या बैठकीत गणपत गायकवाड यांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती तसेच सर्व कायकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कल्याणमधील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत अशी माहिती समजत आहे.

भाजप आणि शिवसेना शिंदे गटात शीतयुद्ध?
कल्याण डोंबिवलीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात शीतयुद्ध सुरु असल्याची माहिती सर्वश्रूत आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी डोंबिवलीत भाजपच्या झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा द्यायचा नाही, असाही ठराव झाला होता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील मतभेद टोकाला गेल्यामुळे वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांना हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून अनेकवेळा शिंदे गटाबाबतची नाराजी व्यक्त केली जात होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...