अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी पारनेर मध्ये एका दुचाकीस्वाराला उडवले. यात दुचाकीस्वार नितीन प्रकाश शेळके (वय 34) या हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता.
या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत भाष्य केले आहे. माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नव्हतं, तो ट्रिटमेंटसाठी मुंबईला जात होता असं त्यांनी म्हटलं आहे.
आ. धस म्हणाले, माझ्या मुलावर रीतसर गुन्हा दाखल झाला आहे. तो मुंबईला एका ट्रिटमेंटसाठी येत होता. अहिल्यानगर जिल्ह्यात अपघात झाला आहे. शेळके नावाच्या तरुणाचा यात मृत्यू झाला आहे.
माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही. त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्हचा अजिबात विषय नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काल सायंकाळी साडेपाच वाजता त्याची सुटका झाली आहे, असे सुरेश धस यांनी सांगितले.