spot_img
अहमदनगरकोट्यवधी रुपयांचा ‘गैरव्यवहार’; आमदार दाते विधानभेत गरजले, नेमकं प्रकरण काय?

कोट्यवधी रुपयांचा ‘गैरव्यवहार’; आमदार दाते विधानभेत गरजले, नेमकं प्रकरण काय?

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
गुरुवार दि. ३ जुलै २०२५ राज्यातील पशुधन विकास मंडळातील साहित्य खरेदीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारावर झाल्याचा आरोप पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी करत विधानभवनात ठाम भूमिका मांडली. पशुधन विकास मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतिश राजू यांनी जनावर साहित्य खरेदीमध्ये नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता केली असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, जनावरांचे कृत्रिम रेतन, गर्भधारणा तपासणी, वंध्यत्व तपासणीसाठी वापरण्यात येणारे ४८ लाख ९९ हजार प्लास्टिक हातमोजे खरेदी करताना २ कोटी ४८ लाख रुपये खरेदी धोरण नियमांचे उल्लंघन करून खर्च करण्यात आले असून स्टील युनिव्हर्सल आर्टिफिशियल इन्समिनेशन गन, थाऊ मॉनिटर, थर्मास फ्लास्क, डिप स्टीक हे साहीत्यही निविदा प्रक्रिया न राबवता बाजार भावापेक्षा अधिकच्या दराने खरेदी करत कोट्यवधी रूपयांचे नुकसान केले असल्याचे आ. दाते यांनी स्पष्ट केले.  मुख्यमंत्र्यांसह पशुसंवर्धन मंत्री आणि विभागाच्या सचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

शिस्तभंगाची कारवाई करणार!
पशुधन विकास मंडळ नागपूर या संस्थेने साहित्य खरेदी करताना अनियमितता केली असल्याने डॉ. सतीश राजू यांच्याकडील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला असुन डॉ. सतीश राजू यांच्याविरुद्ध शिस्तभंगाविषयी कारवाई करण्यात येणार आहे आहे.
पंकजा मुंडे, पशुधन मंत्री, महाराष्ट्र राज्य

दोषींवर कठोर कारवाई करा: आ. दाते  
पशुधन विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी साहित्य खरेदी करताना योग्य निविदा प्रक्रिया राबवली नसल्याने, राज्य शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी व यापुढील काळात अशा प्रकारचे गैरव्यवहार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्याची मागणी आ. काशिनाथ दाते यांनी केली.  

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...