spot_img
ब्रेकिंगगावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा...

गावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा…

spot_img

नेप्तीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे. सर्व हिंदू-मुस्लिम बांधव रमजान ईद असो किंवा दिवाळी एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होत असतात. गावाच्या विकासासाठी धार्मिक ऐक्य महत्त्वाचे आहे. नेप्तीत ईद मिलनच्या कार्यक्रमातून धार्मिक एकात्मतेचा संदेश दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन आमदार काशीनाथ दाते यांनी केले.

नगर नेप्ती (ता. नगर) येथे मुस्लिम समाजाची रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व हिंदू समाजबांधवांनी सहभागी होवून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या ईद मिलन कार्यक्रमास आमदार काशीनाथ दाते यांनी देखील भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. सकाळी शाही मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी रमजान ईदची सामुदायिक नमाज अदा केली.

मौलाना मुनीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करून देशामध्ये शांतता, सुख, समृद्धी व धार्मिक एकात्मतेसाठी प्रार्थना करण्यात आली. संध्याकाळी गावात ईद मिलनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडविले. यावेळी सर्व समाजातील बांधवांनी शीरखुर्माचा आस्वाद घेतला.

यावेळी उद्योजक दिलीप दाते, बापूसाहेब सोनवणे, माजी उपसरपंच फारुख सय्यद, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, माजी सरपंच दिलीप होळकर, दादू चौगुले, रामदास फुले, प्रा. एकनाथ होले, अंबादास पुंड, अशोक जपकर, मुनीर सय्यद, गुलाब सय्यद, जमीर सय्यद, जावेद सय्यद, सलीम सय्यद, बाबूलाल सय्यद, आयुब सय्यद, वाजिद सय्यद, उमर सय्यद, सिकंदर शेख, नौशाद शेख, आसिफ सय्यद, हुसेन सय्यद आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाले हैदर यंग पाट व दोस्ती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...