Politics News : सध्या राज्यात नगरपरीषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला वेग आला आहे. माघारीची डेडलाईन संपली असून आता प्रत्यक्ष प्रचाराला उमेदवार लागले आहेत. दरम्यान नुकताच बारामती नगरपरीषद निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग सोसायटीजवळच भानामतीचा खळबळजनक प्रकार समोर आला होता.
या प्रकरामुळे राज्याच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता असाच प्रकार पुन्हा एकदा पुण्यातच समोर आला आहे. येथे कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात हा प्रकार उघडकीस आला असून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात हा प्रकार करण्यात आला आहे.
बारामती नगरपरीषद निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसाच्या मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने केलेली पुजा चर्चेत आली होती. तर अजित पवारांच्या सहयोग सोसायटीजवळच हा खळबळजनक प्रकार समोर आला होता. येथे नारळ, लिंबु, वेगवेगळ्या डाळी, काळ्या रंगाची काढलेली चांदणी, हळद कुंकु, गारगोटीचे दगड आढळून आले होते. तसेच याचा वापर करून पूजा करण्यात आली होती. यानंतर निवडणुकीच्या काळात अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचे समोर आले होते.
आता असाच प्रकार कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात झाला आहे. येथे इच्छुक उमेदवार सौ तनुजा निलेश पवार यांच्या खेड या ठिकाणी ऑफिस व घरासमोरील तांत्रिक मांत्रिकचा वापर केलेले लिंबू टाकण्यात आले आहेत. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. पवार यांच्या ठिकाणी ऑफिस व घरासमोर अज्ञात तरुणाने काळी जादू केलेले दोन लिंबू फेकल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.
ही उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक पातळीवर ही घटना निवडणूकपूर्व दबावतंत्राचा भाग असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान तनुजा पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा प्रकार विरोधकांकडून दबाव तयार करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच असे कितीही प्रकार झाले तरिही आपण डगमगनारे नाही. आपण अंधश्रद्धा मानणारे नाही. अशा प्रकारांना भीक देखील घालणारे नाही. तर याबाबत पोलिसांतही तक्रार देणार नाही असे म्हटले आहे.



