spot_img
ब्रेकिंगअल्पवयीन मुलीला पळवले, परिवाराने पोलिसांना कळविले! ११ दिवसांच्या शोधाशोधीनंतर...

अल्पवयीन मुलीला पळवले, परिवाराने पोलिसांना कळविले! ११ दिवसांच्या शोधाशोधीनंतर…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणार्‍या संशयित आरोपीस अहिल्यानगर तालुका पोलिसांनी तब्बल 11 दिवसांच्या शोधाशोधीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. ही कारवाई 9 जून रोजी करण्यात आली असून, संशयित आरोपीस 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

29 मे रोजी रात्री 8.30 च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे केलेल्या तपासात संशयित आरोपी कल्याण रामकिसन वाघमोडे (वय 21, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) याने पीडित मुलीस पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी व पीडितेस कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगवी (ता. कागल) येथून ताब्यात घेतले.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये, संशयित आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितल्याने, या गुन्ह्यात अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत कलम अंतर्भूत करून गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून 10 जून रोजी पहाटे अटक करण्यात आली. संशयित आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिवसेनेचे विक्रम राठोड यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; वाचा, प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक नेता सुभाष...

..आता तीन तेरा वाजले ना!; नगरसेवक मनपा प्रशासनाचा विरोधात आक्रमक

शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत, नागरिक भयभीत अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरामध्ये एकीकडे विकासाची कामे मोठ्या प्रमाणात...

राजकीय वातावरण तापले! रोहित पवार अर्ध्या हळकुंडाने शहाणे?, कोणी केले वक्तव्य? पहा..

Maharashtra Politics News: सोलापूरच्या बार्शी तालुक्यात शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर...

१०५ गुंतवणूकदारांची ‘ईतक्या’ कोटींची फसवणूक फिर्याद; पारनेर तालुक्यात नेमकं चाललंय काय?

सुपा । नगर सहयाद्री:- घसघशीत परताव्याचे आमिष दाखवत १०५ गुंतवणूकदारांची ४५० कोटी रुपयांची आर्थिक...