spot_img
अहमदनगरअल्पवयीन मुलीची १२ तासांत सुटका; कोतवाली पोलिसांची कारवाई

अल्पवयीन मुलीची १२ तासांत सुटका; कोतवाली पोलिसांची कारवाई

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणातील मुलगी अल्पवयीन होती आणि आरोपी विधीसंघर्ष बालक होता. त्या अल्पवयीने मुुलीची १२ तासात सुटका करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या आदेशानुसार, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान आरोपीने मित्राकडे पैशांची मागणी केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पिडीत मुलगी व आरोपी कर्जत रेल्वे स्टेशन, जि. रायगड येथे असल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शोध पथकाने तात्काळ कर्जत रेल्वे पोलिसांची मदत घेऊन तपास सुरू केला आणि पिडीत मुलगी, आरोपी व एक अल्पवयीन मित्र यांना ताब्यात घेतले. त्यांना कोतवाली पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, पुढील तपास सपोनि विकास काळे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि विकास काळे, पोसई प्रविण पाटील व गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, गणेश धोत्रे, सलीम शेख, नकुल टिपरे, विजय काळे, पोकाँ अभय कदम, सतिश शिंदे, मपोकाँ योगिता साळवे व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहि‍णींना खुशखबर! जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

महाराष्ट्रात थंडी गायब! आजच हवामान कसं? महत्वाची अपडेट..

मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशासह राज्यामध्ये...

‘ज्या ठिकाणी येईल आली तेथे येईल बजरंग बली’;अनधिकृत प्रार्थनास्थळावर हातोडा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अष्टविनायक पैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक...

बीड की बिहार? पुन्हा दोन सख्ख्या भावांची हत्या! कारण काय?

Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी...