अहिल्यानगर । नगर सहयाद्री
अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने (वय १७) सोमवारी (३० जून) पहाटे तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कर्जत शहरात राहणार्या संशयित अल्पवयीन मुलाविरूध्द अत्याचार, पोसो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मुलगी ही जामखेड तालुयातील एका गावात राहत असून, ती कर्जत येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. डिसेंबर २०२४ मध्ये तिची ओळख संशयित आरोपीशी व्हॉट्सअॅपवर झाली. पुढे जानेवारी २०२५ मध्ये त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट कर्जत येथील एका कॅफेमध्ये झाली. तेव्हापासून दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. त्यानंतर पीडिता नीट परीक्षेच्या तयारीसाठी अहिल्यानगर येथे आली. ६ एप्रिल २०२५ रोजी, मुलाने तिला दिल्लीगेट, अहिल्यानगर येथून दुचाकीवरून अहिल्यानगर तालुयातील एका हॉटेलमध्ये नेले.
तिथे तिने नकार देऊनही, आपल्यासोबत असणारे फोटो वडिलांना दाखवण्याची धमकी देत मुलाने तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. या घटनेमुळे घाबरलेली पीडिता तिच्या मामाकडे भूम (जि. धाराशिव) तालुयातील एका गावात राहायला गेली. मात्र, १६ मे २०२५ रोजी संशयित मुलगा तिथे पोहचून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. य प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी अल्पवयीन मुलाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.