spot_img
अहमदनगरशेतकऱ्यांबाबत मंत्री विखे पाटलांचे वादग्रस्त विधान; वाचा, नेमकं म्हणाले काय?

शेतकऱ्यांबाबत मंत्री विखे पाटलांचे वादग्रस्त विधान; वाचा, नेमकं म्हणाले काय?

spot_img

पंढरपूर | नगर सह्याद्री
राज्यात सप्टेंबर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूव शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले.

परंतु, काही दिवसांपूवच शेतकरी कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारखचं फुकटं कसं मिळेल? असे विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे.

भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शुक्रवारी पंढपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी झालेल्या सभेमध्ये विखे पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर भाष्य केलं. कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायचीफ असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी आपल्या महायुती सरकारने कर्जमाफी जाहीरच केली आहे, आपण शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोतफ असं म्हटलं आहे. मात्र त्यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. सोसायटी काढायची, पुन्हा कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, अनेक वर्ष काम चालू आहे, याच चिंता करायचं काम नाही. महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.

शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. परंतु, तिथंपर्यंत आपलं काम थांबता कामा नये. उद्याच्या तरुणाच्या भविष्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल, उद्योग उभारावे लागणार आहे, असं म्हणत विखेंनी सारवासारव केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून, नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत आहेत. यावर बोलताना विखे पाटील यांनी, कोविडच्या काळामध्ये दोन अडीच वर्षे उद्धव ठाकरे कुठे होते? ते माझं कुटुंब तुमची जबाबदारी म्हणतं लोकांना वाऱ्यावर सोडत घरात बसले होते आणि आता मराठवाड्यात शेतकऱ्यांना दिलासा द्यायला फिरत आहेत, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...