spot_img
महाराष्ट्रआमदार धस यांचे मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप; मंत्री विखे पाटील म्हणाले, पुरावे...

आमदार धस यांचे मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप; मंत्री विखे पाटील म्हणाले, पुरावे असतील तर..

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
Radhakrishna Vikhe Patil : मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत आमदार सुरेश धस यांनी केलेला आरोपाचा नेमका काय संदर्भ आहे? हे मला माहिती नाही. मात्र त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत मत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. हे पुरावे एसआयटीला देता येतील असंही विखे पाटील म्हणाले. मस्साजोग प्रकरणासंदर्भात आयोजित सर्वपक्षीय मोर्चामध्ये बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. धनंजय मुंडे यांच्याच सरकारी बंगल्यावर तीन कोटी रुपयांची डिल झाल्याचे वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होते. याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रतिक्रिया दिली.

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई साई संस्थानकडून दिल्या जाणाऱ्या मोफत भोजनाला विरोध केला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र सुजय विखे यांनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटल आहे. सुजय विखेंच्या या भूमिकेचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील समर्थन केल आहे. साई संस्थानकडून दिल्या जाणाऱ्या मोफत भोजनामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

याबाबत शिर्डीकरांच्या भूमिका महत्त्वाची असून त्या ठिकाणी जाऊन याबाबत विचार करायला हवा. कारण भिक्षेकरांच्या उपद्रवामुळे नागरिकांना त्रास होतो. डॉक्टर सुजय विखे यांनी कोणत्याही साई भक्तांना उद्देशून म्हटलेलं नाही, तसा गैररसमज केला जात आहे. आमच्यासाठी शिर्डी येथील नागरिकांच्या भावना महत्वाच्या आहेत असं विखे पाटील म्हणाले. त्यामुळं कोणाला यावर काय म्हणायचं ते म्हणू द्या असं विखे पाटील म्हणाले.

राज्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.. त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. यासंदर्भात गाळ काढण्याच्या सूचना दिल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. राज्यातील मोठ्या धरणामध्ये गाळ साचला असून याआधी काही निर्णय झाले आहे का? त्याची लवकरच माहिती घेऊ असं राधाकृष्ण विखेंनी म्हंटल आहे. धरणातील गाळ काढण्यासंदर्भामध्ये स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. मंत्रीमंडळाचे खातेवाटप झाले आहे.

मात्र अद्यापही पालकमंत्री निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे महायुतीत पालकमंत्री पदावरून तिढा असल्याच्या राजकीय चर्चा रंगत आहेत. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल. शेवटी तीन पक्षाचे सरकार आहे. हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळं सर्वांचा विचार घेऊनच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता कशासाठी थांबायचे?; पक्ष सोडण्यावर नगरसेवक, पदाधिकारी ठाम

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीवेळी वारंवार मागणी करूनही पक्षाच्या वरिष्ठांनी, नेतृत्वाने आमची दाखल घेतली...

गरीब विक्रेत्यांना लक्ष्य करू नका; खा. नीलेश लंके यांचा इशारा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहरात महानगरपालिका अतिक्रमण मोहीम राबवत असून, रस्त्याच्या कडेला फळविक्री करणारे, हातगाडीवाले,...

निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही; आमदार दातेंचा ठेकेदाराला इशारा

पारनेर | नगर सह्याद्री:- पारनेर जामगांव रस्त्याचे चालू असलेले काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट...

दिल्ली विधानसभेचा बिगुल वाजला; ५ फेब्रुवारीला मतदान अन निकाल…

निवडणूक आयुक्तांची घोषणा नवी दिल्ली / वृत्तसंस्था : नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते आहे. दिल्लीत...