spot_img
ब्रेकिंगमंत्री विखे पाटील अडचणीत; राजकीय वर्तुळात एकच खळबळ, ५४ जणांवर गुन्हा दाखल,...

मंत्री विखे पाटील अडचणीत; राजकीय वर्तुळात एकच खळबळ, ५४ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने २००४ ते २०१० या कार्यकाळामध्ये बनावट कागदपत्रे करून काढलेल्या बेसल डोस कर्जाच्या प्रकरण समोर आलं आहे. मंत्री विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ५४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

८ कोटी ८६ लाख रुपये कर्ज रकमेची अफरातफर करीत कर्जमाफी योजनेस पात्र नसताना कर्जमाफीचा लाभ घेत शासनाची फसवणूक केली, या आरोपाखाली पद्मश्री विखे पाटील सहकारी कारखान्याचे तत्कालीन संचालक आणि विद्यमान जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ५४ जणांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण?
२००४ मध्ये संचालक मडळाने युनियन बँक, बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन झोनल मॅनेजर यांच्याशी संगनमत करून ३ कोटी ११ लाख आणि ५ कोटी ७४ लाख रुपयांचे बेसल डोस कर्ज मंजूर करून घेतले. शेतकरी सभासदांच्या नावे कर्ज मंजूर असताना ती रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. या रकमेचा अपहार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. २००४ ते २००६ या काळात कर्जमाफी योजनेस पात्र नसताना शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे तयार करून योजनेचा लाभ घेतला.

राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील वजनदार नेते असून कबिनेट मंत्री देखील आहेत. त्यामुळे, पोलीस स्टेशनने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून न घेतल्यामुळे तक्रारदार बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी राहता येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालयात त्या अनुषंगाने फिर्याद दाखल केली.

येथील न्यायालयाने फिर्यादीची चौकशी करून सर्व संचालकांच्या विरुद्ध क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम १५६ /३ अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सदरच्या आदेशाविरुद्ध विखे सहकारी साखर कारखानाच्या संचालकांनी उच्च न्यायालय खंडपीठात औरंगाबाद येथे दाद मागितली. याठिकाणी उच्च न्यायालयाने राहता येथील न्यायालयाचा आदेश अमान्य केला होता. त्यानंतर, बाळासाहेब विखे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये यांचा समावेश :
अण्णासाहेब मुरलीधर कडू, अण्णासाहेब सारंगधर म्हस्के, विठ्ठल मारुतराव गायकवाड, विजय शाळीग्राम चंतुरे, रामभाऊ शंकर भुसाळ, गोपीनाथ गेणुजी धमक, लक्ष्मण पुंजाची पुलाटे, भाऊसाहेब बाबुराव घोलप, आप्पासाहेब कारभारी दिघे, कारभारी भाऊसाहेब आहेर, भास्कर निवृत्ती खर्डे, दत्तात्रय साहेबराव खर्डे, अशोक विठ्ठल निबे, तुकाराम नामदेव बेंद्रे, सखाहारी पुंजाची देठे, बाळासाहेब भगवत आहेर, सारंगधर नामदेव दुशिंग, राधाकृष्ण एकनाथ विखे, संपत भाऊराव चितळकर, पार्वताबाई लक्ष्मण तांबे, पद्मा प्रतापराव कडू, भामाबाई राधाकृष्ण काळे, सदाशिव कारभारी गोल्हार, प्रभाकर पांडुरंग विभुते, विठ्ठलराव गंगाधर मांढरे, बापूसाहेब बाबासाहेब घोलप, धोंडिबा विठोबा पुलाटे, गंगाभिसन भिकचंद आसावा, विश्वास केशवराव कडू, आबासाहेब लक्ष्मण घोलप, शांतीनाथ एकनाथ आहेर, सखाहरी नाथा मगर, काशिनाथ मुरलीधर विखे, सर्जेराव सोन्याबापू खर्डे, सुभाष बाळकृष्ण खर्डे, केरुनाथ संभाजी चेचरे, काकासाहेब सोपान म्हस्के, बन्सी बाळू तांबे, बाबासाहेब किसन लोहाटे, सतीश शिवाजी ससाणे, बाळासाहेब पुंजाजी पारखे, लक्ष्मीबाई नारायण कहार, मथुराबाई सोपान दिघे, केशरबाई मोहिनीराज देवदकर, रामभाऊ शंकर भुसाळ, मुरलीधर म्हाळू पुलाटे, युनियन बँक आणि बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन झोनल मॅनेजर, कारखान्याचे कार्यकारी आयुक्त. संचालक, साखर

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भारत-पाक तणाव वाढला, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; RAWच्या माजी प्रमुखांवर मोठी जबाबदारी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध ताणलेले असताना मोदी सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा...

नगरमध्ये बसस्थानकावर दोघा भावांवर जीवघेणा हल्ला; नेमकं काय घडल पहा

  अहिल्यानगर / नगर सह्याद्री - वाटेफळ (ता. अहिल्यानगर) येथील सर्विस रस्त्यावरील बस स्थानकावर रविवारी (27...

शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या, मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

बीड / नगर सह्याद्री : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं...

भयंकर…! चौथी मुलगी झाल्याने आई बनली हैवान; बाळा सोबत केले नको ते…

नगर सह्याद्री वेब टीम : डहाणू शहरातील लोणीपाडा येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे....