spot_img
अहमदनगर'पावसाळी अधिवेशनात मंत्री विखे पाटलांची ग्वाही'; सामान्यांना परवडेल अशा दरात मिळणार 'ती'...

‘पावसाळी अधिवेशनात मंत्री विखे पाटलांची ग्वाही’; सामान्यांना परवडेल अशा दरात मिळणार ‘ती’ सुविधा

spot_img

शिर्डी । नगर सहयाद्री:-
सर्व सामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी सरकारने धोरण घेतले आहे. या धोरणामध्ये अधिक सुलभता कशी येईल हाच सरकारचा प्रयत्न असून, या धोरणातील बदला बाबत काही सुचना आल्यास त्यांचा स्विकार सरकार करेल अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी उपस्थित करण्यात आलेल्या वाळू प्रश्नांवर बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे या वाळू व्यवसायावर माफीयांचा प्रभाव होता. या व्यवसायातून गुन्हेंगारीकरणही वाढले. सर्वसामान्य माणसाला होणारा त्रास कमी व्हावा म्हणूनच या सभागृहात चर्चा करुन, सर्वकश असे वाळू धोरण सरकारने आणून त्याची अंमलबजावणी सुरु केली. या धोरणाबाबत अजूनही सर्वांशी संवाद साधून, तज्ज्ञांची चर्चा करुन या धोरणात अधिक सुधारणा कशा करता येईल यासाठी सरकारची तयारी असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले.

वाळू धंद्याबाबत वेगवेगळे प्रवाह आता पुढे येत आहेत. यामध्ये वाळू खुली करण्यापासून ते ग्रामपंचायत तसेच नगरपालिका हद्दीमध्ये स्थानिक पातळीवर त्यांनाच रॉयल्टी घेण्याचे आधिकार देण्याची कार्यवाही देण्यात येतील का याबाबतही आता विचार करुन वाळू बंधनमुत करण्याबाबतही शासन विचार करीत असल्याचे स्पष्ट करुन मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील पाच ते सहा वर्षांची आकडेवारी पाहीली असता, नवीन वाळू धोरणामुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात कुठेही नुकसान झालेले नाही. यामुळे वाळूच्या धोरणामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे निर्माण केलेले वातावरण निराधार आहे. असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

या व्यवसायातील गुन्हेंगारीकरण थांबविण्यासाठी शासनाचा प्रयत्न असून, महसूल आधिकारी, कर्मचा-यांवर होणा-या हल्ल्यांबाबतही जिल्हाधिका-यांना कारवाईचे सर्व आधिकार देण्यात आले असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...