spot_img
अहमदनगरमंत्री विखे पाटलांची मोठी घोषणा; राज्य सरकारची तातडीने मान्यता 

मंत्री विखे पाटलांची मोठी घोषणा; राज्य सरकारची तातडीने मान्यता 

spot_img

तलाठी नव्हे आता ग्राम महसूल अधिकारी ! /संघटनेच्या नावातही बदल करण्यास राज्य सरकारची मान्यता

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री –
गावपातळीवर महसूल विभागाचा चेहरा असलेल्या तलाठी पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे नाव देण्याची घोषणा महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तलाठी संघटनेच्या नावात बदल करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी तसेच राज्यातून आलेले तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेची मागणी लक्षात घेवून मंत्री विखे पाटील म्हणाले की तलाठी या पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी या नावास तत्वता मान्यता देण्यात येत असल्याचे सांगून तलाठी संघटनेच्या नावात बदल करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित होती.राज्यातील युती सरकारने याबाबत निर्णय करून आता संघटनेचे नाव महाराष्ट्र राज्य तलाठी संघ असे करण्यास मान्यता दिली असून त्याचा शासन आदेशच विखे पाटील यांनी अधिवेशनात दाखवला.मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या घोषणांचे टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी स्वागत केले.

यापुर्वी एक सझा एक कोतवाल असे धोरण घेण्यात आले असून ३हजार ११०सजे निर्माण करण्यास शासनाने मान्यता देण्यात आल्याचे सांगतानाच महसूल सहायक व तलाठी संवर्गतील १०वर्ष सलग सेवा झालेल्या कर्मचार्यांना मर्यादीत विभागीय स्तरावर स्पर्धा परीक्षांना संधी देण्यासाठी तुमच्या हिताचा निर्णय शासन निश्चित करेल आशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

महसूल विभागाचा चेहरा असलेले तलाठी सरकार प्रमाणेच सामाजिक बांधिलकीने काम करीत आहेत.कोणतेही सकंट असो आव्हानात्मक परीस्थीतीत सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण बजावत असलेल्या भूमिकेला सलाम करण्यासाठी या अधिवेशनात उपस्थित असल्याचे विखे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

तलाठी भरती प्रक्रीया अतिशय पारदर्शी पध्दतीने राबविण्यात आली.परंतू केवळ शासनाला बदनाम करण्यासाठी आरोप केले जात आहे.विरोधकांच्या आरोपामुळे तुम्ही सुध्दा बदनाम होत असल्याची जाणीव करून आपल्या संघटनेने पुढे येवून या आरोपांचा निषेध करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरमध्ये खळबळ! शालेय विद्यार्थ्यांसोबत घडलं भयंकर; अंगावर काटा आणणारी घटना…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील एका विद्यार्थ्यांचे सकाळी अपहरण करून दुपारी...

CM शिंदे यांचा नवा प्रस्ताव; भाजपचे नेते बुचकाळ्यात; शिवसेनेतील ‘या’ नेत्याला उपमुख्यमंत्री करा?

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, पण आता मुख्यमंत्रीपदावरुन पेच...

धक्कादायक! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; डोक्यात घातला दगड; अहिल्यानगर मधील घटना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चारित्र्यावर संशय घेऊन झालेल्या गैरसमजांमुळे मोठमोठे गुन्हे झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत...

आज तुमचा दिवस आहे! ‘या’ तीन राशींना मिळणार आनंदवार्ता?

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल....