मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. काही मंत्र्यांना पूर्वीचे आहे तेच बंगले देण्यात आले आहेत. तर काहींच्या बंगल्यामध्ये बदल करण्यात आले आहेत.
महायुती सरकारकडून खातेवाटप करण्यात आल्यानंतर आता नव्या मंत्र्यांना दालनांचे वाटप करण्यात आले. त्यापाठोपाठ आता नव्या मंत्र्यांना बंगल्यांचे देखील वाटप करण्यात आले आहे. काही मंत्र्यांना पूर्वीचे आहे तेच बंगले देण्यात आले आहेत. तर काहींच्या बंगल्यामध्ये बदल करण्यात आले आहेत.
आधी मंत्रीपदावरून, नंतर खातेवाटपावरून काही नेत्यांमध्ये नाराजी होती. आता बंगले वाटपावरूनही काही मंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. कोणत्या मंत्र्याला कोणला बंगला मिळाला आहे ते आपण पाहणार आहोत.
मंत्र्यांना मिळालेले नवे बंगले –
– राधाकृष्ण विखे पाटील – रॉयलस्टोन बंगला
– पंकजा मुंडे – पूर्णकुटी बंगला
– चंद्रशेखर बावनकुळे – रामटेक बंगला
– शंभुराज देसाई – मेघदूत बंगला
– गणेश नाईक – पावनगड बंगला
– धनंजय मुंडे – सातपुडा बंगला
– चंद्रकांत पाटील – सिंहगड बंगला
– राम शिंदे – ज्ञानेश्वरी बंगला
– हसन मुश्रीफ – विशाळगड बंगला
– गिरीश महाजन – सेवासदन बंगला
– गुलाबराव पाटील – जेतवन बंगला
– दादा भुसे – ब- ३ जंजीरा बंगला
– संजय राठोड – शिवनेरी बंगला
– मंगलप्रभात लोढा – ब-५ विजयदुर्ग बंगला
– उदय सामंत – मुक्तागिरी बंगला
– जयकुमार रावल – चित्रकुट बंगला
– अतुल सावे – अ- ३ शिवगड बंगला
– अशोक उईके – अ-९ लोहगड
– शंभूराजे देसाई – मेघदुत बंगला
– आशिष शेलार – रत्नसिंधू बंगला
– आदिती तटकरे- प्रतापगड बंगला
– शिवेंद्रराजे भोसले – पन्हाळगड बंगला
– माणिकराव कोकाटे – अंबर बंगला
– जयकुमार गोरे – प्रचितीगड बंगला
– नरहरी झिरवाळ – सुरूची ०९ बंगला
– संजय सावकारे – अंबर-३२ बंगला
– संजय शिरसाट- अंबर -३८ बंगला
– प्रताप सरनाईक – अवंती – ५ बंगला
– भरत गोगावले – सुरूचि- ०२ बंगला
– मकरंद पाटील – सुरुचि- ०३ बंगला