spot_img
अहमदनगरमहायुतीचे मंत्री ठरले! कोणा कोणाला फोन? वाचा संपूर्ण यादी

महायुतीचे मंत्री ठरले! कोणा कोणाला फोन? वाचा संपूर्ण यादी

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. मात्र किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रशासनाने नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची जोरदार तयारी केली असून दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांना संबंधित पक्षाच्या वरिष्ठांनी फोन केले आहेत.

भाजपकडून आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांत पाटील, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, जयकुमार गोरे, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, अतुल सावे आणि माधुरी मिसाळ यांना शपथविधीसाठी फोन गेले आहेत.

तसेच शिंदेंच्या शिवसेनेकडून भरत गोगावले, उदय सामंत, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आशिष जैस्वाल, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, प्रकाश आबीटकर,संजय शिरसाट, संजय राठोड आणि दादा भूसे यांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन गेला आहे. तर दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार या माजी मंत्र्‍यांचा पत्ता कट झाला आहे..शिवसेनेत ५ जुने मंत्री आणि ७ नवीन आमदारांना म्हणजे एकुण १२ जणांना संधी मिळणार आहे.

त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रि‍पदासाठी फोन आले आहेत. तर धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अनिल पाटील, संजय बनसोड या नेत्यांना अद्याप मंत्रि‍पदासाठी फोन आलेला नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

WhatsApp ने आणले 4 नवीन फीचर्स, एकदा पहाच..

नगर सहयाद्री वेब टीम:- व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी रोज नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. नवीन वैशिष्ट्यांची...

राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार!, महसूल खाते पुन्हा मिळणार का?

मुंबई । नगर सहयाद्री:- नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांचा शपथविधी पार पडणार आहे. आज...

शिंदेंची टीम फायनल! कुणा कुणाला मंत्रिपद फिक्स; यादी आली…

Maharashtra Politics News: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानतंर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला...

चाललंय काय? १५ ,२० काळ्या स्कॉर्पियो आल्या, ३०, ४० गुंड उतरले, बीडनंतर पुन्हा राज्यात संतापजनक घटना

Maharashtra Crime News: बीड जिल्ह्यात पवनचक्कीच्या वादातून घडलेल्या खूनाच्या घटनेचा धक्का अजून ताजा असतानाच...