Rohit Pawar: सभागृहात कार्ड गेम खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या जोर धरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर आणि सरकारवर बोचरी टीका केली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री आणि आमदारांसाठी एका हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून रोहित पवार यांनी हॉटेलमध्ये जेवणाचा बेत ठेवला असेल तर तिथेच कोकाटेंचा सेंड ऑफ केला जाणार का? असा टोला लगावला आहे.
राज्यातील विरोधकांकडून कोकाटेंच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, अजित पवारांनीही कोकाटेंच्या वागणुकीबाबत स्पष्ट इशारा दिला आहे. रोहित पवारांनी कोकाटे आणि आमदार शिरसाट यांच्या प्रकरणावर सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे पवार म्हणाले.