spot_img
ब्रेकिंगशरद पवारांची मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली भेट! काय झाली चर्चा? वाचा...

शरद पवारांची मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली भेट! काय झाली चर्चा? वाचा सविस्तर

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री:-
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. छगन भुजबळ हे आज सकाळी अचानक शरद पवारांच्या भेटीला गेले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. छगन भुजबळांनी शरद पवारांशी तब्बल दीड तास चर्चा केली. छगन भुजबळांनी शरद पवारांशी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली.

भुजबळ म्हणाले, मी आज शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. मी त्यांना भेटण्यासाठी वेळ घेतली नव्हती. त्यांना भेटायला गेलो होतो, पण ते झोपलेले होते. म्हणून मी एक ते दीड तास थांबलो. उठल्यानंतर त्यांनी मला बोलावलं. आम्ही जवळपास दीड तास चर्चा केली. मी त्यांना सांगितलं मी काय कुठलं राजकारण घेऊन गेलेलो नाही. मी मंत्री, आमदार म्हणून आलेलो नाही. पण महाराष्ट्रात सध्या ओबीसींना आरक्षण देण्याचे काम तुम्ही राबवले. पण आता राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. काही लोक ओबीसी, धनगर समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. सध्या राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यातील एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही शांततेसाठी काम केलं पाहिजे, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी मला सांगितले की जरांगे हे मुख्यमंत्र्यांशी भेटले. पण मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या भेटीला गेले होते तुम्ही त्यांना काय आश्वासन दिले, हे मला माहिती नाही. तुम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे.

राज्यांत ओबीसी अरक्षण देण्याचे काम पवारांनी केल आणि आता राज्यांत काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती आहे. काही लोकं मराठा समाजाकडे जात नाही तर दुसरीकडे मराठा समाज इतरांकडे जातं नाही. मी त्यांना आठवण करून दिली की, बाबासाहेब अंबेडकर नाव देण्यावेळी मराठवाडा पेटला होता त्यावेळी देखील आपण पुढाकार घेतला होता. त्यांच अस म्हणणं आहे की, आम्हाला जारांगे सोबत काय चर्चा केली हे महिती नाही.

हाके, ससाणे, वाघमारे उपोषण सोडायला तुम्ही गेलात त्यावेळीं काय चर्चा झाली हे देखील मला माहिती नाही. त्यावेळी मी त्या आंदोलकांना आश्वासन दिले की, सरकार योग्य उपाय काढेल. मी त्यांना विनंती केली की, तुम्हाला राज्याचा चांगला अभ्यास आहे. आम्हाला सगळा अभ्यास आहे असं नाही. ५० लोकांमध्ये कशी काय चर्चा होऊ शकते, असे छगन भुजबळ म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...