spot_img
ब्रेकिंगमंत्री भुजबळ म्हणतात माझ्या जीवाला धोका..? जरांगे पाटील म्हणतात ते रडून फसवतात!

मंत्री भुजबळ म्हणतात माझ्या जीवाला धोका..? जरांगे पाटील म्हणतात ते रडून फसवतात!

spot_img

छत्रपती संभाजीनगर| नगर सह्याद्री-

 Chhagan Bhujbal V/S Manoj Jarange: मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या सरसकट आरक्षणाला विरोध कायम ठेवला आहे. बुधवारी सभागृहात बोलताना भुजबळांनी जीवाला धोका असल्याचे म्हटले. दुसरीकडे भुजबळ रडून सरकारला फसवत आहेत, असा आरोप मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

भुजबळ विधानसभेत बोलताना म्हणाले, माझे पोलिस संरक्षण अचानक वाढवले, मी विचारलं तर म्हणाले तुम्हाला धोका आहे. माझ्यावर बंदुकीची गोळी चालू शकते. आजवर मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, त्याचे कारण त्यांची सद्सद्विवेक बुद्धी जागरुक होती, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले.

भुजबळ यांच्या आरोपांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, स्वतःला संरक्षण मिळावे म्हणून भुजबळ काहीही बोलत आहेत. रडून सरकारला फसवत आहेत. त्यांना त्यांच्यावरचे आरोप लिअर करुन घ्यायचे आहेत. पुन्हा जेलमध्ये जायचे नाही, म्हणून हे सगळं सुरु आहे. मराठा आरक्षण मिळाले नाही पाहिजे, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे.

ओबीसी महामंडळ तुम्ही खाल्ले, पाय तोडण्याची भाषा तुम्हीच करायची, तुम्हाला कोण कशाला गोळी मारेल? तुम्हाला मारण्यावाचून कुणाचे अडलेले नाही. सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याऐवजी भुजबळांवरच्या केसेस मागे घेत आहे.
मागासवर्ग आयोगातील माजी सदस्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करायला नको होता.

संवैधानिक पदावरील अध्यक्षाने जातीचा विचार करायचा नसतो. मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे त्यांनी आरक्षण दिले असते तरी काही अडचण नव्हती. मराठ्यांना द्यायचे म्हटले की अनेकांचे पोट दुखते. भुजबळांचे ऐकून सरकारने आणि देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेऊ नये, नाहीतर मराठा मोठे आंदोलन उभे करेल. भुजबळ बोलले की त्यांना हवे ते दिले जाते. आमचे त्याबद्दल काहीही म्हणणं नाही. परंतु आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला मिळाले पाहिजे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुप्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद...

सावकारकीने घेतला व्यावसायिकाचा बळी; केली आत्महत्या, काय आहे प्रकरण

एक कोटीच्या कर्जाचा तगादा; दोघांवर गुन्हा दाखल अहिल्यानगर / नगर सह्याद्री - एक कोटी रुपयांच्या...

इंदोरप्रमाणे नगरला स्वच्छ सुंदर करणे हाच ध्यास : आ.संग्राम जगताप

सलग तिसऱ्या दिवशी शहरात डीप क्लीन स्वच्छता मोहीमेमुळे परिसर चकाचक अहिल्यानगर / नगर सह्याद्री - नगर...

महिला क्रिकेटमध्ये भारताची जगज्जेतेपदावर मोहोर; ‘त्या’ दोन षटकांत गेम फिरला, खेळाडूंनी विजयाचा जल्लोष सोडला अन् पराभवानंतर..

हरमनप्रीत कौरचा जबरदस्त डाव; त्या दोन षटकांत गेम फिरला, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या हातून...