spot_img
ब्रेकिंगकोट्यवधींचा दूध घोटाळा? आमदार रोहित पवारांनी 'ती' फाईल काढली बाहेर, पहा, नेमकं...

कोट्यवधींचा दूध घोटाळा? आमदार रोहित पवारांनी ‘ती’ फाईल काढली बाहेर, पहा, नेमकं प्रकरण काय

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
राज्यातील शासकीय आश्रमशाळेत मोठा दूध घोटाळा झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका निनावी व्यक्तीने आपल्याला एकूण ११ फाईल पाठवल्या असून सत्ताधारी पक्षाचाच हा माणूस असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.

रोहित पवारांनी पुढे म्हटलं की, मला पाठवण्यात आलेल्या ११ पैकी दोन फाईल मी आता दाखवत आहे. पहिली फाईल आदिवासी आश्रमशाळेतील दूध पुरवठ्याची आहे. ॠआश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना २०० मिली दूध पुरवले जाते. या दूध पुरवठ्यासाठीचा ॠपहिला करार २०१९ मध्या झाला आहे.

या करारात ४६.४९ रुपये दर होता. चितळे, महानंद, अमूल दूधाचे दर ४९.७५ रुपये होते. त्या दराने दूध पुरवठा होत होता. मात्र ॠ२०२३-२४ मध्ये मात्र हा दर १४६ रुपये दर झाला आहे. १६४ कोटी रुपयांचे हे टेंडर आहे. एवढ्या महागड्या दराने दूध खरेदी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी करत आहे. यामध्ये ८० कोटी रुपयांचं कमिशन दिलं गेलं आहे, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.

शेतकर्‍याकडून ३० रुपये दराने घेतलेले दूध गरीबांच्या मुलांना १४६ रुपये दराने दिले जात आहे. ॠया विरोधात पीएमओ, सीएमओ, न्टीकरप्शनकडे तक्रार देणार आहे. ॠपुण्यातील आंबेगाव तालुयातील खाजगी दूध डेअरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याच्या दूध संघाला हे काम दिले आहे, असं देखील रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...