spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये दूध भेसळ? ११ दूध संकलन केंद्रावर धडक कारवाई

अहमदनगरमध्ये दूध भेसळ? ११ दूध संकलन केंद्रावर धडक कारवाई

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
नगरच्या दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्यावतीने राहुरी, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुयातील सुमारे ११ दूध संकलन केंद्रावर धडक कारवाई केली. त्यात काही केंद्रावरील तपासणीसाठी दुधाचे नमुने घेण्यात आले. काही ठिकाणी भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

राहुरी तालुयातील शिलेगाव येथील जगदंबा दूध संकलन केंद्र, जगदंबा माता दूध संकलन केंद्र येथील गायीच्या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर शिलेगावातील पतंजली दूध संकलन केंद्राची पथकाने पाहणी केली. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी.बी. पवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एस. पालवे व जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनोने यांनी केली.

कोपरगावातील साई अमृत दूध संकलन केंद्र, धोंडेवाडी येथील नारायणगिरी दूध संकलन केंद्र, जवळके येथील प्रशांत भागवत शिंदे यांच्या गोठ्यात कारवाई करण्यात आली. या सर्व ठिकाणचे दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी बडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनोने यांनी केली. कर्जत तालुयातील कृष्णाई दुध शितकरण केंद्र येथील दुधाचे नुना घेयातअ ाला तसेच १२०० लीटर दुध नष्ट करण्यात आले. तसेच जामखेड तालुयातील खर्डा येथील भगवान कृपा दुध संकलन केंद्रात दुधाचे नमुने घेण्यात येऊन ३८०० लीटर दुध नष्ट करण्यात आले.

कर्जत तालुयातील कृष्णाई दुध शितकरण केंद्र, जगदंबा दुध संकलन व शितकरण केंद्र, दूरगाव येथील साईबाबा दुध शितकरण केंद्र, अन्वेषा दुध संकलन केंद्र, मिरजगावातील गजानन महाराज मिल्क व प्रोडटस, कुळधरण येथील त्रिमूर्ती दुध संकलन केंद्र, कर्जत येथील सदगुरू मिल्क व प्रोडटस, बहिरोबावाडीतील नागराबाई यादव दुध संकलन केंद्र, मिरजगाव येथील अ‍ॅग्रोवन मिल्क प्रोडटस येथील दुधाचे नमूने घेण्यात येवून दूध नष्ट करण्यात आले.गजानन महाराज मिल्क व प्रोडटसचे ४२०० लीटर दूध नष्ट करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...