spot_img
तंत्रज्ञानMicrosoft चा सर्व्हर डाऊन, जगाला मोठा फटका

Microsoft चा सर्व्हर डाऊन, जगाला मोठा फटका

spot_img

मुंबई : नगर सह्याद्री
जगातील मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टचा सर्वर डाऊन झाला आहे. या सर्वरमध्ये बिघाड झालाय. त्याचा फटका सगळ्या जगाला बसला आहे. जगभरातील एअरपोर्ट्वर विमान सेवा ठप्प झाली आहे. अनेक विमानांची उड्डाण रखडली आहेत. तिकीट बुकिंगपासून चेक इन पर्यंत वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. भारतातील एअरपोर्ट, विमान सेवेवर मोठा परिणाम झालाय.

दिल्ली एयरपोर्ट वर ऑनलाइन सेवा ठप्प झाली आहे. सर्वरमध्ये बिघाड झाल्याने परिणाम झाालय. डेनमार्क मध्ये फायर अलार्म काम करत नाहीय. मायक्रोसॉफ्टच्या सर्वरमध्ये बिघाड झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात इमर्जन्सी बैठक सुरु आहे. ऑस्ट्रेलियातील पेमेंट सेवेवर सुद्धा परिणाम झालाय. दुबई एयरपोर्टला सुद्धा फटका बसला आहे. हैदराबादवरुन कोलकात्याला जाणाऱ्या प्रवाशांना मॅन्युअल तिकीट देण्यात आल्या आहेत. ब्रिटनच्या रेल्वे सेवेवर परिणाम झालाय. ब्रिटनमध्ये स्काय न्यूजच लाइव टेलिकास्ट बंद झालय. नेदरलँड्सची हवाई सेवा प्रभावित झालीय. अमेरिकेत स्काय न्यूजच लाइव प्रसारण ठप्प झालय. लंडन शेअर बाजार ठप्प झालाय. भारतात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु एयरपोर्ट वर फ्लाइट्सना ठरलेल्या वेळेपेक्षा उशीर होत आहे. भारताने या बद्दल मायक्रोसॉफ्टशी संपर्क साधलाय. भारतात तीन मोठ्या एयरलाइन्स कंपन्यांवर थेट परिणाम झालाय. यात इंडिगो, स्पाइसजेट आणि अकासा या कंपन्या आहेत. सायबर सिक्योरिटी प्लेटफॉर्म क्राउडस्ट्राइकमध्ये अडचण आल्याने सेवा प्रभावित झाली आहे. मायक्रोसॉफ्ट बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...