spot_img
ब्रेकिंगम्हसणे फाटा टोलनाका ग्रामस्थांनी केला बंद; कारण काय?

म्हसणे फाटा टोलनाका ग्रामस्थांनी केला बंद; कारण काय?

spot_img

बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन । पो. नि. दिवटे यांची यशस्वी मध्यस्थी
सुपा । नगर सहयाद्री:-
नगर-पुणे महामार्गावर घडणारे अपघात नारायणगव्हाण सुप्यासह धोकादायक गावांच्या प्रश्नासंदर्भात केलेले म्हसणे फाटा टोलनाका बंद आंदोलन उपविभागीय अधिकारी बांधकाम विभाग संजय भावसार यांनी ग्रामस्थांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मध्यस्थीने टोलबंद आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी १ तास टोलनाका बंद करत महामार्गावर महामार्ग संरक्षणाचे पत्रक वितरीत करत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय भावसार यांनी व्यवस्थापन चेतक एन्टरप्राईजेस लि.टोल प्लाझा म्हसणे फाटा यांना तातडीच्या सुचना केल्या शिरूर-नगर महामार्गावरील डिव्हाईडर कट बंद करणे, महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांना दिशादर्शक फलक, सोलर दिवे, स्पीड ब्रेकर, इत्यादि बाबी तातडीने लावण्यात याव्यात, महामार्गावर रिफ्लेक्टर सोलर दिवे बसवणे, टोल नाक्यावर मुलभुत सुविधा, सुलभ शौचालय इत्यादी गोष्ट्री पुरविणे, अपघातग्रस्तांना तातडीने सुविधा पुरविणे, वृक्षारोपनाबरोबर वृक्षांचे संगोपन करणे, महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग तातडीने( चार दिवसात) हटविणे आदी मागण्या तातडीने मार्गी लावण्यात येणार आहेत उर्वरीत मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले.

त्याचबरोबर नारायणगव्हाण भुसंपादनासाठी संयुक्त मोजणी तातडीने करण्यासंदर्भात संबंधीत मिळकतदारांसमवेत दि.२१ जानेवारी रोजी नारायणगव्हाणमध्ये समन्वय बैठक घेवून पोलिस संरक्षणात मोजणी करणार असल्याचे तालुका भूमिअमिलेखचे प्रशांत शिंदे, अविनाश गावडे यांनी प्रसंगी आश्वासन दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे गोकूळ घोडके, टोल व्यवस्थापक भडके, शंकर खोसे आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सचिन शेळके यांच्या नेतृत्वात सुरू झालेले आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

यावेळी लक्ष्मण शेळके, कैलास गाडीलकर सर, वाडेगव्हाणचे सरपंच किशोर शेळके, माजी सैनिक पांडूरंग कळमकर, संजय सोनवणे, विकास कळमकर, अमोल शेळके, प्रकाश चव्हाण, अजिंक्यतारा दरेकर, बालाजी कांडेकर, पांडुरंग शेळके, संतोष कोहकडे, संजय साबळे, भाऊसाहेब वाळुंज, दशरथ वाळुंज, शिवाजी नवले, गजेंद्र सरडे आदिसह पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हलगर्जीपणा सहन केला जाणार
नारायणगव्हाण चौपदरीकरणासह नगर पुणे महामार्गाच्या सुरक्षेसंदर्भात कुठलाही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, प्रशासकीय कामात अडथळा निर्माण करणारांना जेलमध्ये टाका, सदर परिस्थितीला गांभिर्याने घेतले नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांना घरी बसवून नगर पुणे महामार्ग टोलमुक्त केल्या शिवाय शांत बसणार नाही.
सचिन शेळके/ शरद पवळे ( सामाजिक कार्यकर्ते)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...