spot_img
अहमदनगरहवामान तज्ज्ञ पंजाबराव डख रविवारी टाकळी ढोकेश्वरला; शेतकरी मेळाव्यात करणार मार्गदर्शन

हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख रविवारी टाकळी ढोकेश्वरला; शेतकरी मेळाव्यात करणार मार्गदर्शन

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
आदर्श शिक्षक, भूजल अभ्यासक आणि शेतकर्‍यांचे मार्गदर्शक स्वर्गीय सुखदेव साळवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त येत्या रविवारी, दि. २९ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता टाकळी ढोकेश्वर येथे भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्यातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख उपस्थित राहून शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत.

स्व. सुखदेव साळवे यांनी आपल्या भूजल संशोधन आणि शेतीविषयक मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रात विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आणि शेतकर्‍यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पंजाबराव डख, जे आपल्या अचूक हवामान अंदाज आणि शेतीविषयक सल्ल्यांसाठी ओळखले जातात. ते या मेळाव्यात शेतकर्‍यांना हवामान बदल, पिकांचे नियोजनआणि शाश्वत शेती पद्धतींवर मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे शेतकर्‍यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करण्यास मदत होईल. हा मेळावा टाकळी ढोकेश्वर येथील भीमप्पा लॉन्स् येथे होणार असून, यात शेतकर्‍यांना आपले प्रश्न थेट तज्ञांसमोर मांडण्याची संधी मिळेल.

पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, मित्रपरिवार आणि देवकृपा प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधव, नागरिक आणि हितचिंतकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्व. साळवे यांच्या कार्याचा गौरव करताना शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि हवामान बदलाशी सामना करण्याच्या पद्धतींची माहिती मिळावी, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. उपस्थितांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धर्माच्या नावाखाली… ; घुलेवाडी येथील घटनेवर बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

संगमनेर / नगर सह्याद्री घुलेवाडी सप्ताह जे घडले ते तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे....

दारू पिण्याची शर्यत बेतली जीवावर; एकाचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री - सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे रविवारी (१७ ऑगस्ट) घडलेल्या...

नगरमध्ये देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला सापळा

कृष्णा लॉजवर छापा | तिघांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरातील बुरुडगाव रोडवरील कृष्णा लॉजवर कोतवाली...

पारनेरमध्ये बिबट्याचा हैदोस, कुठे घडला प्रकार पहा

निघोज | नगर सह्याद्री बिबट्याचा निघोज, गुणोरे, गाडिलगाव, कुंड, खंडोबा पाऊतके परिसरात हैदोस सुरू असून...