spot_img
अहमदनगरमर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

spot_img

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत
अहिल्यानगर । नगर सहयाद्री
अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‌’शेड्यूल्ड बँक‌’चा दर्जा दिला आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बँकेला ‌’शेड्यूल्ड बँक‌’चा दर्जा मिळाला आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बँक प्रयत्नशील होती. या दर्जामुळे बँकेची विश्वासार्हता, कार्यक्षमता वाढून व्यावसायिक विस्तारात मोठी वाढ होणार आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष अमित मुथा, संचालक अनिल पोखरणा, आनंदराम मुनोत, संजय चोपडा, सीए मोहनलाल बरमेचा, संजय बोरा, सीए अजय मुथा, किशोर मुनोत, सुभाष बायड, श्रीमती मीना मुनोत, विजय कोथिंबिरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य राजेश झंवर, कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी बँकेला ‌’शेड्यूल्ड बँक‌’चा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांचा यावेळी सर्व संचालक मंडळाने सन्मान करून पेढे वाटून आनंद व्यक्त केला. अध्यक्ष हस्तीमल मुनोत पुढे म्हणाले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तब्बल दोन दशकांनंतर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना शेड्यूल्ड बँक दर्जा देण्यास सुरुवात केली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेला प्राधान्याने हा बहुमान देण्यात आला आहे. याबाबत बुधवारी जारी करण्यात आलेल्या गॅझेट अधिसूचनेद्वारे मर्चंट्स बँकेचा समावेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम, 1934 च्या दुसऱ्या अनुसूचित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यामुळे आता आरबीआयच्या विविध सवलती उपलब्ध होणार आहेत. यामध्ये लिक्विडिटी फॅसिलिटीज, क्लिअरिंग हाऊस सिस्टीममध्ये सहभागी होण्याचा हक्क, तसेच शासकीय प्रकल्पांना कर्ज देण्याचा अधिकार यांचा समावेश आहे. बँकेने कर्जांच्या व्याज दरात एक टक्का कपात करण्याचा निर्णय घेत कर्जदारांना दिलासा दिला आहे.

उपाध्यक्ष अमित मुथा म्हणाले, मर्चंट्स बँकेने नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या प्रगतीची घोडदौड कायम असून त्यांच्या नेतृत्वाखाली आता बँकेच्या शिरपेचात ‌’शेड्युल्ड बँक‌’ दर्जाचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या दिनांक 31 मार्च अखेर एकूण ठेवी एक हजार 462 कोटी 16 लाख रुपयांच्या असून एकूण कर्जे 968 कोटी 39 लाख रुपयांचे वितरीत केले आहे. बँकेस निव्वळ नफा सात कोटी तीन लाख रुपये झाला आहे. बँकेचा सीआरएआर 15.75 व नेट एनपीए शून्य टक्के आहे. सर्वोत्कृष्ट बँकिग सेवा देत मर्चंट्‌‍स बँकेने अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात वेगवान बँकिंग सेवा ग्राहकांना दिल्या आहेत. शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळणे ही बँकेसाठी ऐतिहासिक उपलब्धी आहे.

संचालक सीए अजय मुथा म्हणाले, मर्चंट्स बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केल्यानेच प्राधान्याने शेड्युल्ड बँकेचा दर्जा बँकेला मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या पुढाकारामुळे हे शक्य झाले आहे. सध्या देशभरात एकूण एक हजार 423 अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांपैकी आता 52 बँका ‌’शेड्यूल्ड बँक‌’ म्हणून मान्यताप्राप्त आहेत. ज्यामध्ये अहमदनगर मर्चंट्स बँकेचा समावेश झाला असल्याने बँकेचा विस्तार आता वाढणार आहे.
संचालक अनिल पोखरणा म्हणाले, बँकेला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाल्याने बँकेची उंची वाढली आहे.

आता इतर सहकारी बँका व पतसंस्थेच्या ठेवीही बँकेला स्वीकारता येणार असल्याने बँकेच्या ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पुराणिक यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. आभार मानताना व्उपाध्यक्ष अमित मुथा म्हणाले, मर्चंट्स बँकेच्या प्रगतीत सर्व खातेदार, ठेवीदार व कर्जदार यांच्यासह बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. सर्व संचालक मंडळ एकजुटीने बँकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत उत्कृष्ट टीम वर्क करत आहेत, असे सांगून सर्वांचे आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....

‘हुजूर मराठे आ रहे हे’! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेला मुंबईकडे कूच करणार

बीड । नगर सहयाद्री  येत्या 29 ऑगस्ट रोजी केवळ दोन दिवसासाठी मुंबईला या, तिसऱ्या दिवशी...