spot_img
देश'भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक' सरकार स्थापनाच्या घडामोडींना वेग..

‘भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक’ सरकार स्थापनाच्या घडामोडींना वेग..

spot_img

नवी दिल्ली- 
आज गुरुवारी दि (6 जून) रोजी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे. त्यात अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे बडे नेते उपस्थित राहणार आहे. नवीन सरकार स्थापनेची तयारी आणि शपथविधीबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी (5 जून) एनडीएने नरेंद्र मोदी यांची नेतेपदी एकमताने निवड केली. बैठकीत टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 14 पक्षांचे 21 नेते उपस्थित होते. मोदींनी नायडू आणि नितीश यांच्याही स्वतंत्र बैठका घेतल्या. या दोघांनीही युती कायम राहील, अशी ग्वाही दिल्याचे मानले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. पक्षाला 240 जागा मिळाल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा (272) ही संख्या 32 कमी आहे. अशा परिस्थितीत ते 14 मित्र पक्षांच्या 53 खासदारांसह आघाडीने सरकार चालवेल. 7 जून रोजी मोदींची भाजप संसदीय पक्ष-एनडीए संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे. यानंतर सरकार स्थापनेचा दावा राष्ट्रपतींसमोर मांडला जाणार असून 8 जून रोजी शपथविधी होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडण्याचे संकेत हवामान विभागाने दिले...

मंत्री विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; काय झाली चर्चा?

लोणी । नगर सहयाद्री :- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून...

‘आदर्श’ चालवायचा वेश्यावसाय; अहिल्यानगरमध्ये पोलिसांचा छापा..

Ahilyanagar Crime News: शहरातील एका लॉजवर अनाधिकृत वेश्याव्यवसाय करणार्‍या रँकेटचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला....

आजचे राशी भविष्य; या राशीच्या लोकांच्या घरात आज येणार पाहुणे, आनंदी वातावरण की ताण वाढणार?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी...