spot_img
अहमदनगरमविआने 'त्या' घटनेचे राजकारण थांबवावे अन्यथा जशास तसे उत्तर; नगर भाजप आक्रमक

मविआने ‘त्या’ घटनेचे राजकारण थांबवावे अन्यथा जशास तसे उत्तर; नगर भाजप आक्रमक

spot_img

अ‍ॅड. अभय आगरकर यांचा इशारा
अहमदनगर | नगर सह्याद्री
राज्यातील महायुती सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर व त्यांच्या प्रेरणेने काम करत आहे. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होणे हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यात सरकारची काहीही चूक नाही. याधीही देशात व राज्यात अनेक अशा घटना घडल्या आहेत. मात्र भाजपाचे त्यावेळी खालच्या दर्जाचे राजकारण केले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने त्या घटनेचे राजकारण करणे त्वरित थांबवावे, अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शहर भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी दिला.

शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आज सकाळी जुन्या बसस्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून महाविकास आघाडी विरोधात घोषणा देत निषेध केला. यावेळी शहर भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष मयूर बोचूघोळ, शहर सरचिटणीस प्रशांत मुथा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फलक झळकवत त्यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला.

यावेळी शहर भाजपचे पदाधिकारी महेश नामदे, राहुल जामगावकर, अजय चितळे, गोपाल वर्मा, कैलास गर्जे, सुनील सकट, अमोल निस्ताने, सुनील तावरे, प्रशांत बुर्‍हाडे, अजित कोतकर, बाबासाहेब सानप, सोमनाथ जाधव, करण कराळे, संजय ढोणे, सुरेश लालबागे, श्याम बोळे, दीपक मगर, सागर शिंदे व बंटी डापसे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...