Crime News: गेल्या काही दिवसांमध्ये शाळेत मुलींसोबत विनयभंग करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता पुन्हा गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात सदरची घटना घडली आहे.
वर्गशिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केला. याप्रकरणी शिक्षकाविरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील रंभाजी भोसले ( रा- कोल्हार ता. राहाता ) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी: शिक्षका स्वप्नील भोसले श्रीरामपूर तालुक्यातील वडाळामहादेव परिसरातील एका महाविद्यालयात कार्यरत आहे. भोसले याने मुलीच्या शरीरावर हात फिरून, लगट करून, तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पीडित विद्यार्थिनी दिलेल्या फिर्यानुसार शिक्षक स्वप्नील रंभाजी भोसले याच्या विरोधात विनयभंग गुन्हा भा. न्या. सं. कलम ७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सोळंके करीत आहे.