spot_img
देशहॉटेलला भीषण आग; १५ जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना पहा

हॉटेलला भीषण आग; १५ जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना पहा

spot_img

कोलकाता / नगर सह्याद्री :
कोलकातामधील सर्वात जुन्या आणि सर्वाधिक गजबजलेल्या परिसरातील सहा मजली हॉटेलला मंगळवारी सायंकाळी आग लागली. या आगीत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. यापैकी अनेकांचा मृत्यू गुदमरून झाला तर एक व्यक्ती आगीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना इमारतीवरून खाली पडला.

कोलकाताच्या बुर्राबाजार परिसरातील मदनमोहन रस्त्यावरील ऋतुराज हॉटेलमध्ये सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाकडून दहा बंब घटनास्थळी बचाव कार्य करत होते. रात्री १ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

कोलकाता पोलिसांनी सांगितले की, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी विशेष चौकशी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आग भडकल्यानंतर अनेक लोक हॉटेलच्या आत अडकले होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यावसायिक गोदामाच्या वर ऋतुराज हॉटेलचे बांधकाम करण्यात आलेले आहे. तळमजल्यावर गोदाम असून त्यावर पाच मजली हॉटेल आहे.

आग भडकल्यानंतर जिने आणि मजल्यावरील मोकळ्या परिसरात धुराचे लोट पसरले. आगीपासून सुरक्षित राहण्यासाठी हॉटेलमधील काही लोक गच्चीवर गेले. काहींनी खिडक्यांवर असणाऱ्या अरुंद कट्ट्याचा आधार घेतला. कट्ट्यावर उभ्या असलेल्या लोकांना सुरक्षित खाली आणण्यासाठी अग्निशमन दलाने हायड्रॉलिक शिडीचा वापर केला. तसेच गच्चीवर असलेल्या लोकांनी आपल्या मोबाइल टॉर्चरचा वापर करत मदत मागितली.

सदर दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर कोलकाता मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय पासवान नावाच्या व्यक्तीला काल रात्री रुग्णालयात दाखल करताच मृत घोषित करण्यात आले. आगीतून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी त्यांनी इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच आग संपूर्ण विझळ्यानंतर बुधवारी (३० एप्रिल) सकाळी अग्नीशमन दलाने शोध घेतला असता १४ जणांचे मृतदेह आढळून आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या, मुंबईला जायचं, मनोज जरांगेंची मोठी घोषणा

बीड / नगर सह्याद्री : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं...

भयंकर…! चौथी मुलगी झाल्याने आई बनली हैवान; बाळा सोबत केले नको ते…

नगर सह्याद्री वेब टीम : डहाणू शहरातील लोणीपाडा येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे....

सावेडीत धूमस्टाईल चोरी; इतक्या रकमेचा मुद्देमाल पळविला

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : सावेडीतील गुलमोहर रस्त्यावरील आनंद विद्यालयासमोर संजय किराणा दुकानाजवळ एका 85...

कौटुंबिक वादातून पुतण्याचा काकावर कुर्‍हाडीने हल्ला; पुढे घडले विचित्र

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : शहरातील सिध्दार्थनगर भागात कौटुंबिक वादातून एका पुतण्याने आपल्या काकावर कुर्‍हाडीने...