spot_img
अहमदनगरबुरुडगाव येथील कचरा डेपोला भीषण आग! नेमकं काय घडलं?

बुरुडगाव येथील कचरा डेपोला भीषण आग! नेमकं काय घडलं?

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महानगरपालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोतील प्रकल्पाजवळ शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग नियंत्रणात आणली आहे. आगीमध्ये प्रकल्पाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ठेकेदार संस्थेमार्फत लवकरच त्याची दुरुस्ती होऊन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

बुरुडगाव कचरा डेपो मध्ये असलेल्या एका डीपीजवळ शॉर्टसर्किट झाला. तेथून प्रकल्पापर्यंत जाणारी विद्युत वाहिनी जळाल्याने प्रकल्पाच्या पॅनलमध्ये आग लागली. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. आग आटोक्यात आली आहे. आगीत प्रकल्पातील मशीनच्या काही पार्टचे नुकसान झाले आहे.

त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यानंतर लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केले जाईल. बुरुडगाव कचरा डेपो येथे सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. त्यात आगीच्या घटनेचे फुटेज असून, त्याची तपासणी करण्यात येत आहे. शॉर्ट सर्किटमुळेच आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे व या घटनेबाबत पोलिसात नोंद करण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...