spot_img
अहमदनगरमहाविद्यालयात सामूहिक नमाज! संतप्त नागरिकांनी केली 'मोठी' मागणी, कुठे घडला प्रकार?

महाविद्यालयात सामूहिक नमाज! संतप्त नागरिकांनी केली ‘मोठी’ मागणी, कुठे घडला प्रकार?

spot_img

कोपरगाव। नगर सहयाद्री
कोपरगावात सुप्रसिद्ध असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या संलग्न असलेल्या व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी वैद्यकीय महाविद्यालयात खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयात संबंधित प्राचार्य व इतरांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या एका हॉलमध्ये जमा करून सदर ठिकाणी नमाज पठण करण्याचे प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.

या घटनेची माहिती शहरात सर्वत्र पसरताच शहरातील सर्व सकल हिंदू समाज व सर्व हिंदू प्रेमी संघटनांनी संबंधित शालेय ट्रस्टी व नमाज पठण करायला लावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती तसेच यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेन सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे, विनायक गायकवाड, चेतन खुबानी अमित जैन, संतोष गंगवल यांनी या घटनेचा निषेध करत नमाज पठण करायला लावणार्‍यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याच मागणी केली आहे.

जनार्धन स्वामींच्या नावाचा वापर करून कारभार चालणार्‍या या मेडिकल कॉलेजच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन सामूहिक नमाज पठण करण्याचा प्रकार घडत असून या बाबत पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या जनसमुदायने संबंधित मॅनेजमेंटकर्ते यांना विचारले असता. त्यांनी आम्हाला हा काहीच प्रकार माहीत नसल्याचे सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“स्थानिकांकडूनच खरेदी करा; हाच खरा स्वदेशी आणि हिंदुत्वाचा उत्सव” : नगरसेवक योगीराज गाडे

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : दिवाळीचा सण जवळ आला असताना, नागरिकांनी स्वदेशी आणि स्थानिकांना प्राधान्य...

दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्या बसला भीषण आग, २० जणांचा होपळून मृत्यू, 16 जण…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी दुपारी भरधाव एसी बसला अचानक भीषण...

झेडपीसाठी मोठी अपडेट, 28 ऑक्टोबरला अंतिम…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 जुलै...

आझाद ठुबे यांचा स्पेस कोण भरून काढणार?

जवळा जिल्हा परिषद गटात रस्सीखेच | सुजित झावरे, दीपक लंके, विश्वनाथ कोरडे, अशोक सावंत,...