spot_img
ब्रेकिंगअल्पवयीन मुलीचे लग्न लावले? आई वडिलांसह सहा जणांना भोवले..पतीचा दुसरा विवाह उजेडात..

अल्पवयीन मुलीचे लग्न लावले? आई वडिलांसह सहा जणांना भोवले..पतीचा दुसरा विवाह उजेडात..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
पहिल्या पत्नीसोबत घटफोट न घेता, दुसऱ्या अल्पवयीन मुलीशी विवाह करत छळ केल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरात घडला आहे. पिडीत अल्पवयीन मुलींनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती ऋषिकेश मदन शिंदे ( रा. आंतरकोळी ता. चिखली जि. बुलढाणा ) याचेसह सहा जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन फिर्यादी मुलीचा जुन महिन्यात वडिलाचे मित्र यांच्या मध्यस्थीने ऋषिकेश सोबत राहत्या घरातच विवाह सोहळा पार पडला. त्यावेळी फिर्यादीने वय पुर्ण नसल्याची वडिलांसह त्यांना कल्पना दिली होती. परंतु त्यांनी काही होत नाही असे म्हणत बळजबरीने ऋषिकेश सोबत लग्न लावले. यावेळी ऋषिकेश शिंदे, पतीची आई सुरबा मदन शिंदे, माहाविर वरखेडकर, त्यांचे इतर नातेवाईक असे हजर होते. लग्नानंतर पती ऋषिकेश सोबत अहिल्यानगर शहरात एकत्रित राहत होतो.

त्यानंतर पती ऋषिकेशने बळजबरीने शरिर सुखाची मागणी केली. त्यावेळी विरोध केला असता बळजबरीने शरिर सबंध केले. कालातंराने पती ऋषिकेशने दारु पिवुन लाथा बुक्याने मारहाण केली. तसेच वडीलांचे नावावर टिव्हीएस एक्सेस स्कुटर, ३४ हजार, १० हजार रुपये किंमतीचे फोन लोनवर घेतले. त्याचे हप्ते भरले नाही. त्यानंतर नोव्हेंबर पासुन फोन बंद केला. पतीची अधिक चौकशी केली असता ऋषिकेशचे पुर्वीच दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याची माहिती उजेडात आली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीचा फिर्यादीवरून ऋषिकेश मदन शिंदे ( रा. आंतरकोळी ता. चिखली जि. बुलढाणा ), महाविर अर्जुन वरखेडकर( रा. मोरया पार्क, अहिल्यानगर ) अभि सानप ( पूर्ण नाव माहित नाही, रा. बुलढाणा ), सुरबा मदन शिंदे ( रा. आंतरकोळी ता. चिखली जि. बुलढाणा ) याच्या विरोधात तर अल्पवयीन मुलीचाच्या इच्छेविरुद्ध लग्न लावल्या प्रकरणी आई-वडील अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हिंदू संकृतीला डळमळीत करणार्‍या वोकिझम संकटाला समजून घ्या; शिवशंभू व्याख्याते नीलेश भिसे

उत्कृष्ट आरास स्पर्धेत सिद्धेश्वर तरुण मंडळ व समर्थ युवा प्रतिष्ठान प्रथम अहिल्यानगर | नगर सह्याद्री आता...

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पाणीपुरीवाल्याला मारहाण, नगरमध्ये ‘येथे’ घडला प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील दिल्लीगेट परिसरात पाणीपुरी विक्रेत्याने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग...

चास घाटात दरोडा!; ‘ती’ टोळी पकडली

चास घाटाजवळील घटना; सात लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे...

धक्कादायक! नाशिकमध्ये गावगुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये पत्रकारांना गावगुंडानी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर...