spot_img
अहमदनगरविवाहितेची पोलीस ठाण्यात धाव; सासरवाडीच्या लोकांनी केलं असं काही..

विवाहितेची पोलीस ठाण्यात धाव; सासरवाडीच्या लोकांनी केलं असं काही..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने या प्रकरणी शनिवारी (22 फेब्रुवारी) फिर्याद दिली आहे.पती सचिन वसंत शेळके, सासू अनिता वसंत शेळके, सासरे वसंत विश्वनाथ शेळके, दीर बाजीराव वसंत शेळके, नणंद सविता गणेश कोल्हे आणि तिचा पती गणेश कोल्हे (सर्व रा. खारेखर्जुने, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संशयित आरोपींनी फिर्यादीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. पतीकडून सतत हुंड्यासाठी त्रास दिला जात, असा आरोप करण्यात आला आहे. 14 जुलै 2020 ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सासरच्या मंडळींकडून फिर्यादीचा छळ करण्यात आला. पती सचिन याने तिला सतत 50 लाख रूपये माहेरहून आणण्यास सांगितले. त्यासाठी वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.

शिवाय, सासू अनिता शेळके, सासरे वसंत शेळके, दीर बाजीराव शेळके, नणंद सविता कोल्हे आणि तिचा पती गणेश कोल्हे यांनीही मानसिक त्रास दिला. पीडितेला उपाशी ठेऊन घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न झाला. शिवाय, पती व कुटुंबीयांनी जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी फिर्यादीनुसार भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस अंमलदार निता अडसरे अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘झेंडीगेट परिसरातील दोन कत्तलखाने जमीनदोस्त’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- महानगरपालिकेने सोमवारी सकाळपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली...

किरण काळे यांना ठाम विश्वास; मशाल हाती घेताच म्हणाले, ‘आता…’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह...

शहरात हत्याचा थरार! तरूणाचे हात-पाय तोडले..

Maharashtra Crime News: एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री ८ ते १० जणांच्या...

सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीची ३ मार्चला बैठक; आ. सत्यजीत तांबे यांनी दिली मोठी माहिती

संगमनेर । नगर सहयाद्री:- पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित असून, त्याचा...