spot_img
अहमदनगर'लग्नाला' आला नको 'तसला' कारभार झाला; नालेगावात तरूणावर तलवारीने वार

‘लग्नाला’ आला नको ‘तसला’ कारभार झाला; नालेगावात तरूणावर तलवारीने वार

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी कोपरगाव येथून अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात आलेल्या तरूणावर चॉपर व तलवारने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला आहे. चेतन रवींद्र निंदाणे (वय 26 रा. कोर्ट रस्ता, कोपरगाव) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नालेगावच्या मारूती मंदिराजवळ, टांगे गल्लीत ही घटना घडली.

दरम्यान, जखमी चेतन निंदाणे याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिघांविरूध्द मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ, आर्मअ‍ॅक्ट आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितु सुरेश चव्हाण (वय 45), रोहन जय चव्हाण (वय 25), दाद्या ऊर्फ सुनील जाधव (वय 27, तिघे रा. मुन्सीपल कॉलनी, गोगादेव मंदिरा जवळ, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

चेतन निंदाणे हे नातेवाईकाच्या लग्नासाठी नगरमध्ये आले होते. त्यांचे मामा लक्ष्मण अर्जुन सारसर यांच्या शेजारी राहणार्‍या संशयित आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून चेतन सोबत पुन्हा वाद घातले. या वादातून रोहन याने चॉपरने चेतनवर वार केला. जितुने तलवारीने वार करून खूनाचा प्रयत्न केला.

दाद्या ऊर्फ सुनीलने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चेतन गंभीर जखमी झाल्याने त्यांना नातेवाईकांनी तात्काळ रूग्णालयात दाखल केले. मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले. मात्र घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मारहाण करणार्‍या संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस. सेदवाड करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...