spot_img
अहमदनगरमार्बलची ट्रक उलटली, चालक....; 'या' रस्त्यावर अपघाताचा थरार

मार्बलची ट्रक उलटली, चालक….; ‘या’ रस्त्यावर अपघाताचा थरार

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री
जामखेड तालुक्यातील साकत घाटात मार्बलने भरलेला ट्रक पलटी झाला. सदरच्या घटनेत चालक ट्रक चालक गंभीर जखमी झाला असुन जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मंगळवार ( १८) रोजी सकाळी मार्बलचा ट्रक साकत मार्गी जामखेडकडे निघाला होता. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक पलटी झाला.

यावेळी वाल्मिक नेमाने जामखेड वरून साकतला चालले होते. नेमाने व इतर वाहन चालकांनी जखमी चालकाला कँबीनमधून बाहेर काढले. नेमणे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना संपर्क करत अपघाताबाबत माहिती दिली. त्यानंतर रुग्णावाहिके मधून जखमी चालकाला जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सरोदे पोलीस करीत आहे. जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून खुपच संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अनेक वाहने साकत मार्गे ये जा करतात. साकत रस्ता अरूंद आहे. लवकरात लवकर रस्ता रूंदीकरण व्हावे व घाट रूंदीकरण व्हावे अशी मागणी होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...