spot_img
ब्रेकिंगमराठवाडा, विदर्भाला पावसाचा तडाखा; अनेक गावांचा संपर्क तुटला

मराठवाडा, विदर्भाला पावसाचा तडाखा; अनेक गावांचा संपर्क तुटला

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने चांगला हाहाकार उडावल्याचं दिसतंय. हवामान विभागाने ७२ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. नांदेड, लातून, जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने दाणादाण केलीय. यामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती आल्याची माहिती मिळतेय. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पळालाय, कारण शेतपिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येतंय.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावमधील सोना नदीला पूर आला. काल दुपारपासूनच संततधार पाऊस या परिसरात सुरू आहे. सोयगाव तालुक्यातील सगळ्याच भागातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातला या पावसाळ्यातला हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी होणार अशी शक्यता दिसते आहे.

सोलापूर शहर आणि परिसरात मागच्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस आहे. काल सोलापुरात २१ मिमी पावसाची नोंद झालीय. सोलापुरात हवामान विभागाने काल येलो अलर्ट जारी केला होता. बार्शी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झालाय. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे हिंगणी आणि ढाळे पिंपळगाव प्रकल्प ओसांडून वाहू लागलाय. सलग दोन दिवस सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे भोगावती आणि निलकंठा नदीला पूर आलाय. नदीकाठाच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय.

जालन्यातील परतूर तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आलाय. दरम्यान आष्टी ते सावरगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना देखील सावरगाव येथील नागरिकांचा जीवघेणा प्रवास पाहायला मिळालाय. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका शेती पिकांना बसला आहे. जिल्ह्यातील किनवट,माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालीय. पुराचे पाणी शेती शिवारात शिरले आहे. शेती पिकांसह खरडून गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

सर्वदूर पावसाची संततधार
लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान पावसाळ्यातील चार महिन्याच्या सरासरीच्या जवळ हा दोन दिवसातील पाऊस झाला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात ४० टक्के इतका पाणीसाठा आहे. आज लातूर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्याने जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाने दिलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या अकोलखेड गावात नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. आज सकाळपासूनच अकोला जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. त्यात सातपुडा पर्वतरांगात देखील संततधार पाऊस सुरू आहे.

परभणीच्या सेलू शहरात देखील दमदार पावसाने हाहाकार माजवला. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना दमदार पाऊस आणि वीज पुरवठा खंडित अश्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय. बीड जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस होत असून परळीसह परिसरात अनेक नद्यांना पाणी आले आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय.परळी महामार्गावर असणारा तात्पुरता पूल वाहून गेलाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार?; शरद पवार मोदी सरकारमद्ये जाणार…

Politics News : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. प्रहार...

अर्बन बँक घोटाळा प्रकरण; पुन्हा महत्वाची अपडेट, कुणाचा जामीन अर्ज फेटाळला?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- नगर अर्बन बँकेचे चार्टर्ड अकौंटंट विजय मर्दा यांचा अटकपूर्व जामीन...

Ahilyanagar Car Accident: अहियानगरमध्ये अपघात! तीन ठार; कुठे घडली घटना?

Ahilyanagar Car Accident: विवाह समारंभ उरकून घराकडे परत येत असलेल्या बोलोरो जीपला दुचाकीस्वार आडवा...

फडणवीसांचा ठाकरेंना दणका, 35 नेत्यांचा राजीनामा, पहा काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत....