spot_img
ब्रेकिंगMaratha Reservation : मराठा आरक्षणाची लढाई पुन्हा कोर्टात...; जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची लढाई पुन्हा कोर्टात…; जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री –
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात ओबीसी संघटनांकडून आव्हान देण्यात आले आहे. ‘सगेसोयरे’ व ’गणगोत’ यांच्या प्रतिज्ञापत्राद्वारे कुणबी दाखले देण्यासाठी काढलेल्या २६ जानेवारीच्या मसुद्याला ओबीसी संघटनेने कोर्टात आव्हान दिले आहे.

ओबीसी वेल्फेयर फाऊंडेशन तर्फे ऍड. मंगेश ससाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. संविधानाच्या विरोधात जाऊन सगेसोयरे यांची व्याख्या बदलण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाने २६ जानेवारीला अधिसूचना काढून सगेसोयर्‍यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नोटिफिकेशन काढले असून १६ फेब्रुवारीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाला ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी संघटनांनी विरोध केला होता. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिउत्तर देत मंगळवारी इशारा दिला. ‘जर ते सगेसोयर्‍यांच्या बाबतीत कोर्टात गेले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करेन’ असे जरांगे म्हणाले. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून न्यायालयीन लढाया लढल्या जाण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...