spot_img
अहमदनगरअजितदादांच्या मंत्र्याच्या अनेक फाईल्स रखडल्या! पडद्यामागे नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर

अजितदादांच्या मंत्र्याच्या अनेक फाईल्स रखडल्या! पडद्यामागे नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोठ्या हालचाली सुरू आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार असा विश्वास अनेकदा महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातो. मात्र, याच महायुतीत पडद्यामागे काय घडतंय याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील अनेक मंत्र्याच्या फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात रखडल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाच्या) अनेक फायलींचा प्रवास मुख्यमंत्री कार्यालयात रखडला असल्याची चर्चा सुरू आहे. जवळपास आठरा ते वीस महत्त्वाच्या फाईल मुख्यमंत्री कार्यालयात रखडल्या असल्याची माहिती आहे. शिवभोजन वाढीव थाळी यासारख्या अनेक निर्णय प्रलंबित असल्याची देखील माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

त्याचबरोबर अनेक राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदार संघातील कामांच्या फाईल देखील मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची माहिती आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या मतदारसंघातील आणि इतर महत्त्वाच्या कामांच्या फायली रखडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाच्या मंत्र्यामध्ये आणि आमदारांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या पातळीवर विभागातील निर्णय होत आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवरील अनेक निर्णय रखडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. महायुतीचे सरकार असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत नाही. मात्र खाजगीत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

तर आगामी निवडणुकीसाठी राज्यातील सर्व पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. आपल्या मतदारसंघातील कामे, बैठका, दौरे सुरू केले आहेत. अशातच आमदारांच्या फाईल्स अडकल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आता महायुतीत सोबत असताना जाहीरपणे बोलणे आणि नाराजी व्यक्त करणे नेत्यांनी टाळल्याच्या चर्चा सुरू आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...

गाडिलकर कुटुंबियांकडून शेकडो ठेवीदारांना गंडा?; सिस्पेविरोधात अन्नत्याग आंदोलन

पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील वाघुंडे येथील विनोद गाडिलकर व विक्रम गाडिलकर कुटुंबीयांनी दामदुप्पट सह...