spot_img
महाराष्ट्रमनोज जरांगे यांची तब्येत खालावली; उपोषणाच्या चौथ्या दिवस, वाचा अपडेट

मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; उपोषणाच्या चौथ्या दिवस, वाचा अपडेट

spot_img

जालना | नगर सह्याद्री
मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण 25 जानेवारी पासून सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थ आंतरवाली सराटी येथील उपोषणात सहभागी होणार आहेत.

मनोज जरांगेंच्या मागणीवर तोडगा काढून हे उपोषण लवकरात लवकर सोडवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. मनोज जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग येथील ग्रामस्थ आज मंगळवारी आंतरवाली सराटी येथे उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पुरावे दिलेले आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांनी तशी यंत्रणा राबवली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही आपली मागणी असून त्यावर आम्ही ठाम आहोत. बाकीचे निर्णय घेण्याचे काम त्यांचे आहे. जे काही पुरावे दिले आहेत, त्यावर चर्चा होईल, ते जे निर्णय घेतील ते समोर येईल आणि ते सगळ्यांना मान्य करावे लागेल. धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतही प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, तर यंत्रणेवरील दबाव तर शंभर टक्के कमी होणार असल्याचा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

वैभवी देशमुख उपोषणात सहभागी होणार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहेत. मी कालच मागणी केली आहे सरकार शिष्टमंडळ पाठवावे. सरकारने उपोषण गांभीर्याने घेतले पाहिजे. लवकरात लवकर शिष्ट मंडळ पाठवून यावर निर्णय घेतला पाहिजे. आज उपोषणात वैभवी सहभागी होणार आहे आईची तब्येत ठीक असेल तर आई पण सहभाग घेणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

मंत्री मुंडे यांचा राजीनामा झाला, तर यंत्रणेवरील दबाव कमी होईल
धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतही प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, तर यंत्रणेवरील दबाव तर शंभर टक्के कमी होणार असल्याचा विश्वास धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला. मागच्या ज्या दहा दिवसातील घडामोडी आहेत, व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप यावर गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. ज्या गोष्टी घडल्या, त्या परत नाही घडल्या पाहिजे, त्यामुळे यावर निश्चित दबाव कमी होईल, असे देशमुख म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...