Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीडमध्ये झालेल्या मेळाव्या दरम्यान भाषण करत असताना अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तपासण्या केल्या. यावेळी रक्ताचे देखील नमुने घेण्यात आले आहे.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी २४ तासांसाठी त्यांना बीडच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे. प्रकृती साथ देत नसल्याचे जरांगे पाटील यांनी भाषणात सांगितले होते.