जालना/नगर सहयाद्री : मराठा आंदोलक उद्या मुंबईकडे निघणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाजबांधव आता मुंबईला निघतील. या आंदोलनाला निघण्यापूर्वीच मनोज जरंगे यांनी मराठा समाजाला महत्वाचा संदेश दिला. उद्या मराठे मुंबई निघणार आहेत. मराठा समाजाने आता घरी बसू नये. हे शेवटचे आंदोलन आहे आहे.
मराठा समाजाने ताकदीने मुंबईकडे निघावे, मराठे भीत नसतात व आम्ही गुन्हे दाखल होण्यास भीत नाहीत. आम्ही मुंबईला जाणार आहोत. मी आणि माझा समाज 26 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करणार आहे. 26 तारखेला गल्ली गल्लीत मराठा समाज दिसणार आहेत. मी मारायला भीत नाही. मी मुंबईवरुन आता आरक्षण घेऊन येणार आहे. आपण शांततेत चाललो आहोत. पण आपल्यावर गुन्हे दाखल झाले तर राज्यात लोकशाही नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारण्याचा प्रकार
शासनाकडून सुधारणा आणि दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून नेला जात आहे. अध्यादेश महत्त्वाचा आहे. पण ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना दाखले दिले पाहिजे. आता 54 लाख लोकांना नोंदी मिळाल्या आहे. समितीने किती काम केले हे बघणे महत्वाचे आहे. ड्राफ्ट सुधारणा फक्त बहाणे आहेत. मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. आता 54 लाख लोकांना प्रमाणपत्र भेटले पाहिजे
ठरल्याप्रमाणे मुंबईला जाणार
जे ठरले आहे त्या मार्गाने मराठा समाज मुंबई जाणार आहे. आता आम्ही निघालो आम्ही आरक्षण घेणारच आहोत. आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आतापर्यंत दोन उपोषण झाले. हे आरक्षणासाठी शेवटे उपोषण असणार आहे.