पारनेर | नगर सह्याद्री
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे होणार्या २९ ऑगस्टच्या आंदोलनास उपस्थित राहण्यासाठी जाणार्या मोर्चाचे पारनेर तालुयाच्या वतीने भाळवणी येथील नगर कल्याणरोड वरील एस . के . चौकात जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.
मोर्चाच्या तयारीसाठी भाळवणी येथील नंदनवन लॉन्समध्ये नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाचे मराठा समन्वयक गोरख दळवी, गोरक्षनाथ पटारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पारनेर तालुयाचे मराठा समन्वयक संभाजी औटी, बाबासाहेब तरटे, विकास रोहकले, दत्तात्रय अंबुले, रामराव गाडेकर, मच्छिंद्र मते, संदीपशेठ कपाळे, हरीभाऊ जाधव, संपत रोहकले आदींसह अन्य समाजबांधव उपस्थित होते .
यावेळी भाळवणी येथे २७ ऑगस्ट रोजी येणार्या मनोज जरांगे यांच्या ताफ्याचे ५१ जेसीबी, १० डी जे लावून स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी जेसीबीतून फुलांची पुष्पवृष्टी ताफ्यावर करण्यात येणार आहे. मोठ्या क्रेनच्या साह्याने फुलांचा मोठा आहार घालून मनोज जरांगे पाटलांचा सत्कार करण्यात येणार आहे. या स्वागताच्या तयारीसाठी समाजबांधवांनी स्वतःहून जेसीबी व डीजे देण्याचे कबूल केले. पारनेर तालुयात भाळवणीनंतर टाकळी ढोकेश्वर येथेही मोर्चाचे भव्यदिव्य स्वरूपात स्वागत करण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये समाजबांधवांनी स्वतःची मोटारसायकल, चारचाकी, ट्रॅटर किंवा इतर वाहन घेऊन सहभागी व्हावे.
या मोर्चाला पारनेर तालुयातून पाच हजार वाहनांसह समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होतील असे समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मोर्चाच्या स्वागताला भाळवणी ढवळपुरी परिसरातील सर्व गावांतील समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा सेवक कामगार नेते शिवाजीराव औटी, शाहूराव औटी, बबलूशेठ रोहकले, सूरज रोहकले, अक्षय साठे, बाबासाहेब रोहकले, आकाश रोहकले, अभिजीत रोहकले, मारुती रोहकले,अॅड. धनंजय लांडगे, अक्षय चेमटे, प्रशांत हिंगे, ओंकार कपाळे यांनी केले आहे.