spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; डॉक्टर म्हणाले...

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; डॉक्टर म्हणाले…

spot_img

 

जालना | नगर सह्याद्री

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मराठा मतांचे राजकारण पाहायला मिळणार आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. तर विविध पक्षाचे नेते, आमदार, खासदार मराठा मतांसाठी सातत्याने जरांगे पाटील यांची भेट घेत आहे. मनोज जरांगेना भेटण्यासाठी येणारे विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे रात्री उशिरा येतात. त्यांची चर्चा ही उशिरापर्यंत सुरु असते. त्यामुळे जरांगे पाटील यांचे सतत जागरण होत आहे.

तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं उपोषण करत असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना काल रात्रीपासून ताप, अशक्तपणाचा त्रास होत आहे. तापासोबत त्यांना इन्फेशन देखील झाले आहे. तापासोबत अंगदुखी, अशक्तपणा, घसादुखी आणि कफ झाला आहे.

डॉटरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांची काल रात्री तब्येत बिघडल्याने त्यांना घरीच सलाईन लावण्यात आले. तसेच त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहे. ते नमुने अधिक तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. सध्या मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीची गरज आहे. कारण त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. त्यामुळे त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉटरांनी दिला आहे. तसेच आज सकाळीही मनोज जरांगेंना सलाईन लावण्यात आले आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...