spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, आरक्षण द्या अन्यथा...

मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, आरक्षण द्या अन्यथा…

spot_img

बीड / नगर सह्याद्री :

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू असतानाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे. 6 जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

“डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. आम्ही यंदा राजकारणात नाही. ना उमेदवार दिलाय, ना कोणाला पाठिंबा दिला. मात्र 6 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार. तसेच 5 जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार, अशी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

“महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. आज देऊ, उद्या देऊ असे करून ७ महिने झाले. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे. इतके प्रेम उफाळून येते की त्यांचं की सांगता येत नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. मात्र गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे,” अशी टीकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...