spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे पाटील 'या' तारखेला पारनेरमध्ये...!नेमका कार्यक्रम काय? पहा.

मनोज जरांगे पाटील ‘या’ तारखेला पारनेरमध्ये…!नेमका कार्यक्रम काय? पहा.

spot_img

सुपा। नगर सहयाद्री-
मनोज जरांगे पाटील २३ मार्चला पारनेरमध्ये येणार आहेत. येथील बाजारतळावर दुपारी १२ वाजता महासंवाद मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज एकवटणार आहे.

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न करता दहा टक्क्यांवर समाजाच्या तोंडाला पाने पुसले व सगेसोयरे या शब्दाला दिलेली बगल या गोष्टीवर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरुन आपल्या मागण्यासाठी सरकारची कोंडी करण्यासाठी शनिवार दिनांक २३ मार्च रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थित पारनेर बाजारतळावर महासंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याबाबत गुरुवारी पारनेर तालुयातील सकल मराठा समाजाची नियोजन बैठक पार पडली.

यावेळी या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. यात आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा बांधवानी उमेदवारी अर्ज दाखल करणे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे, सगेसोयरे आद्यादेश लागू करावा व आगामी काळात लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने आंदोलने करावी व मनोज जरांगे पाटील यांच्या पारनेर दौरा व संवाद महा मेळावा यशस्वी करण्यासाठी गावागावात बैठकी विषयी माहिती पोहच करणे आदींचे नियोजन करण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर–बेलापूर मार्गावर भीषण अपघात; एक ठार, तीन जखमी

श्रीरामपूर/ नगर सह्याद्री    श्रीरामपूर–बेलापूर मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या राजपाल वस्त्रालय दालनासमोर गुरुवारी रात्री उशिरा...

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...