Manoj Jarange Pati: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्राती विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेकांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे आता सर्वच पक्षातील आमदार, नेते तसेच निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेताना दिसत आहेत.
दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती देखील घेत आहेत. बीड विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांच्याकडे १७ जणांनी इच्छुक म्हणून मुलाखत दिली होती. आता १७ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे मनोज जरांगे पाटील यांनी ठरवले आहे. हे १७ इच्छुक उमेदवार उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बीड मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग असून जरांगे पाटील यांचा उमेदवार मैदानात उतरल्यास प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे. १७ जण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून ३० तारखेला जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार मैदानात कायम राहणार असून उर्वरित उमेदवार हे आपले उमेदवारी अर्ज माघारी घेणार आहे.