spot_img
महाराष्ट्रभुजबळांच्या बालेकिल्ल्यातच मनोज जरांगें कडाडले; म्हणाले मी ठरवलं तर...

भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच मनोज जरांगें कडाडले; म्हणाले मी ठरवलं तर…

spot_img

नाशिक / नगर सह्याद्री –
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी येवला गाठलं आहे. येवल्यात मनोज जरांगे पाटील यांनी थेट छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली आहे. ‘मी ठरवलं तर डायरेक्ट कार्यक्रम करतो, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची अंदरसुलमध्ये सभा झाली. या ठिकाणी त्यांच्याआधी छगन भुजबळ यांचा सभा झाली. भुजबळ यांच्यासभेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी एकवटले. या सभेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘येवला तालुक्यात सांत्वनपर भेट आहे. आता रस्त्यात गाव आहे. ते बाजूला सारू का? कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही. मात्र, मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा. आता कोणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष? एकदा जर लोकांनी ठरवलं, येवला पवित्र करायचं तर काही अडचण आहे का? माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नाही. तुम्हाला ज्याला पाडायचं, त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. पण मराठा आरक्षण डोळ्यासमोर ठेवा’.

‘मी ठरवलं तर डायरेक्ट कार्यक्रम करतो. आता एक माईक जुना झाला म्हणून दुसरा हातात घेतला. तो जुना सारखा सारखा बिघडतो. मी नवा माईक हातात घेतला, यातून लोकांच्या न्यायाचा आवाज येतो, असं म्हणत जरांगेंनी भुजबळांना लक्ष्य केलं.

नरेंद्र मोदींवर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मराठ्यांची गरजच नाही, असं म्हणण्यापेक्षा छोट्या छोट्या उद्योगपतींची देखील गरज नाही. मोठेच उद्योगपती लागतात. त्यांचा संदेश बरोबर आहे. कारण सरकार पाडायला आता गरीब एक झाले आहेत. मत वाया जाऊ देऊ नका. ज्याला पाडायचे, त्याला पाडा हे मी सांगितलं आहे. मी कोणाचं नाव घेतलं नाही. आमचं विधानसभेला समीकरण कुणाशी जुळलं नाही हे दोन्ही सारखेच आहे’.

प्रचाराला कुणीही येईल म्हणून आपल्या सोबत आहे, असं नाही. काही व्यासपीठावर पडून देखील रपारप पाडतील. लोक तिकडे दिसले तरी शेवटी जात खूप महत्त्वाची आहे. शेवटी मतदान करताना त्याच्या समोर त्याची लेकरं आलीच पाहिजेत. कोणी बरोबर असल्याने काही मते पडत नाही. त्यांच्या बरोबर असून देखील कार्यक्रम होतो, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये आधी केलंय आता पारनेरमध्ये करुन दाखवणार; नेमकं काय म्हणाले संदेश कार्ले पहा..

नगरप्रमाणेच पारनेर तालुक्यातील प्रचार दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद पारनेर | नगर सह्याद्री विधानसभा निवडणूक म्हटलं...

राज्यात सत्तांतर होणार; शरद पवार यांनी सांगितले खरे कारण…

पुणे / नगर सह्याद्री – लोकसभा निवडणुकीत पक्षफोडी करणाऱ्या भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच...

झुंडशाहीला लगाम घालण्यासाठी पुढे या!; काशिनाथ दाते काय म्हणाले पहा…

पारनेरमधील महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांचे मतदारांना पाच वर्षापूर्वीची चूक दुरुस्त करण्याचे आवाहन पारनेर |...

श्रीेगोंद्यात एकाला पैशाची मस्ती अन् दुसर्‍याला टक्केवारीची!; मतदान संपताच बारामतीकडे रवाना होणार!

राहुल जगतापांचा पॅटर्न भावू लागला! कोणता साक्षात्कार झाला म्हणून, महायुतीचं समर्थन करणार्‍या ताई अचानक...