spot_img
ब्रेकिंगमतदानाच्या दिवशीच मनोज जरागेंचे मोठे आवाहन, 'त्यांना' सोडू नका....

मतदानाच्या दिवशीच मनोज जरागेंचे मोठे आवाहन, ‘त्यांना’ सोडू नका….

spot_img

जालना | नगर सह्याद्री

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. घनसावंगी मतदारसंघात गोरी गंधारी गावात मनोज जरांगे यांनी मतदान केलं. प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपल्या हक्काचा माणूस निवडला पाहिजे. यावेळी मतदानाचा उठाव करावा लागेल असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. आपला अधिकार आहे. योग्य माणूस निवडण्याची हीच संधी असते. सर्व जनतेने मतदान केलं पाहिजे. मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचं आहे. आपल्या लेकराच्या बाजूने जो असेल त्याच्या बाजूने १००% मतदान करावं. मतदान करताना आपल्या लेकाला आणि लेकीला विचारून मतदान करावं. आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्याला सोडू नका. आपल मत विजयाच्या बाजूने पडलं पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

कोणी माझ्या बाजूला फोटो काढला याचा अर्थ मी कोणाला पाठिंबा दिला असं नाही. हे समजणं समजून घ्यावं. समाजाने म्हणून जे करायचं ते करावं. कोणी संभ्रम निर्माण करेल मी कुठेही टीम पाठवली नाही. कुठेही मेसेज पाठवला नाही. मराठा समाजाने संभ्रम करून घेऊ नका तुम्हीच मालक आहात. आपला कोणालाही पाठिंबा नाही. मराठा समाजाने योग्य निर्णय घ्यावा, असं जरांगे यावेळी म्हणाले.

मनोज जरांगे पाटील हिंदुत्व तोडणारा राक्षस, अशा शब्दात स्वयंघोषित कालीचरण महाराज यांनी टीका केली. त्यांच्या या टीकेलाही मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तो १००% राजकीय दलाल आहे. परत बोलला याचा अर्थ तो राजकीय नेत्यांची पाय चाटतो. त्याला हिंदू धर्माची काही घेणं देणं नाही. याला मराठ्यांचा प्रचंड तिरस्कार आहे. आहे. वढ्या – खोड्याला जन्मलेली पैदास आहे ही, अशा शब्दात मनोज जरांगेंनी टीका केली आहे.

मी मैदानात नाही. जनतेच्या हातात आहे. सगळं जनतेने अन्याय आणि अत्याचार विसरू नये. अंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. अंतरवाली सराटीत राज्यातील मराठा बांधव सामूहिक उपोषण करणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक उपोषणाची तारीख ठरवू, सरकार कोणतही येऊ द्या, असं जरांगे यावेळी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

RENAULT TRIBER: 7 लाख रुपयांची कार टाकते टोयोटा इनोव्हा क्रिस्टाला मागे; एकदा पहाच..

नगर सहयाद्री वेब टीम:- जरी देशातील सर्वात लोकप्रिय 7-सीटर कार मारुती सुझुकी एर्टिगा आहे,...

महानगरपालिकेचे जनजागृती अभियान यशस्वी; अहिल्यानगर शहराचा मतदानाचा टक्का वाढला

आदर्श मतदान केंद्राची उभारणी; मतदारांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांमुळे मतदारांकडून समाधान व्यक्त अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

राज्यात 65.11 टक्के तर नगर जिल्ह्यात 71.73 टक्के मतदान

30 वर्षांमधील सर्वाधिक प्रतिसाद, कोल्हापूर जिल्हा हा सर्वात जागरुक, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात निरुत्साह मुंबई । नगर...

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

Gautam Adani News भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतली एका कंपनीने गुंतवणुकदारांची फसवणूक...