Maharashtra Politics News: सुनील केदार यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली होती. मात्र, मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतरही विधासभा अध्यक्षांनी कारवाई केली नसल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा झाल्यास तो सदस्य त्या तारखेपासून अपात्र ठरतो, अशी तरतूद आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अपात्र ठरवले जाऊ शकते.
सोमवारी कोकाटे हे उच्च न्यायालयात अपिल करणार आहेत. त्यामुळे न्यायालया त्यांचे शिक्षेला स्थगिती देणार की शिक्षा कायम ठेवणार यावर देखील त्यांचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई कधी करणार हे सांगितले आहे.
शिक्षेच्या आदेशाची प्रत विधीमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर अपात्रतेच्या संदर्भात कारवाई केली जाणार असल्याचे नार्वेकर म्हणाले आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे.